Download App

BJP साठी गुडन्यूज! निवडणुकीआधीच खासदार करणार पक्षात प्रवेश, जाणून घ्या..

BJP : निवडणुकीच्या तयारीत व्यस्त असलेल्या कर्नाटकातील (Karnataka) भाजपला (BJP) निवडणुकीआधीच गुडन्यूज मिळाली आहे. मंड्या लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुमलता अंबरीश यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप श्रेष्ठींनीही त्यांच्या पक्षप्रवेशाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे खासदार अंबरीश लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा आहे.

वाचा : BJP and NCP : महाराष्ट्रात विरोधक नागालॅंडमध्ये भाजप-राष्ट्रवादी एकत्र, असं बनणार सरकार

या संदर्भात खासदार अंबरीश पत्रकार परिषद घेणार असून याबाबत आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. कदाचित त्या आजच भाजपमध्ये प्रवेश करतील असे सांगण्यात येत आहे. मागील लोकसभा निवडणुकीत अंबरीश या अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरल्या होत्या. भाजपने त्यांना उमेदवारी न देता पाठिंबा मात्र दिला होता. अंबरीश यांनी काही दिवसांपूर्वी राज्याचे माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांचीही भेट घेतली होती. सध्या भाजप हाच सर्वोत्तम पर्याय असल्याचे त्यांनी सुचविले होते. त्यानंतर घडामोडी घडून अंबरीश यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

`Pune BJP म्हणजे मोहोळ, मुळीक, बीडकर आणि रासने हे काही योग्य नाही`

या वर्षाच्या अखेरीस कर्नाटकात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांची जोरदार तयारी भाजपकडून सुरू आहे. सध्या या पक्षात इनकमिंगही वाढले आहे. कोणत्याही परिस्थितीत सत्ता कायम ठेवायची या ध्येयाने पक्ष येथे काम करत आहे. तर दुसरीकडे काँग्रेसनेही वातावरण निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे. भाजपविरोधात आव्हान उभे करण्याचा पक्षाचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण होईल अशी शक्यता दिसत आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भाजप नेते आणि मंत्र्यांचे राज्याचे दौरे वाढले आहेत. आक्रमक प्रचार अभियानही राबविण्यात येत आहे.

https://www.youtube.com/watch?v=QilUE8oexJg

Tags

follow us