Lok Sabha Elections 2024 : यंदाची लोकसभा निवडणूक अनेक अर्थांनी खास आहे. या निवडणुकीत अनेक मातब्बर नेते रिंगणात आहेत. मोठ्या पडद्यावरील सेलिब्रिटी मंडळीही नशीब आजमावत आहेत. पण, यात असेही काही नेते ज्यांच्यासाठी जिंकणे ही फार मोठी गोष्ट नाही. कुणी नऊ वेळा तर कुणी सात वेळा निवडणुकीत बाजी मारली आहे. या नेत्यांनी लोकांनी भरभरून मतदान केलं आहे. ज्याचा परिणाम म्हणून या नेत्यांनी जिंकण्याचं अनोखं रेकॉर्ड आपल्या नावे केलं आहे. कम्युनिस्ट पक्षाचे नेते इंद्रजित गुप्ता यांच्या नावावर सर्वाधिक वेळेस निवडणूक जिंकण्याचे रेकॉर्ड आहे. 1960 मध्ये त्यांनी पहिल्यांदा निवडणूक जिंकली होती. तर 1999 मध्ये शेवटच्या वेळी खासदार बनले होते.
२६ जुलै १९२९ रोजी आसामच्या तेजपूरमध्ये जन्मलेल्या सोमनाथ चटर्जी यांनी दहा वेळेस लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. ४ जून २००४ रोजी त्यांची लोकसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली होती. १९६८ रोजी त्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षात (मार्क्सवादी) प्रवेश केला होता. १९७१ पासून २००४ पर्यंत त्यांनी दहा वेळेस लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला. १९९६ मध्ये त्यांना उत्कृष्ट खासदाराचा पुरस्कार मिळाला होता. १९८४ मध्ये एकदा ममता बॅनर्जी यांनी सोमनाथ चटर्जी यांचा पराभव केला होता.
मैं फकीर हूं! मोदींकडे घर, जमीन-जुमला अन् गाडी काहीच नाही पण..,
तीन वेळेस देशाचे पंतप्रधानपद भूषविलेले अटल बिहारी वाजपेयी यांनी नऊ वेळेस लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला. तसेच दोन वेळेस वाजपेयी राज्यसभेचे खासदारही राहिले. वाजपेयी यांनी १९५२ मध्ये पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढली होती मात्र या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
यानंतर उत्तर प्रदेशातील गोंडा मतदारसंघातून १९५७ च्या निवडणुकीत वाजपेयी पहिल्यांदा निवडून आले. चार राज्यांतून लोकसभेत जाणारे अटल बिहारी वाजपेयी बहुदा पहिलेच राजकारणी असावेत. १९६२ आणि १९८६ मध्ये ते राज्यसभेचे खासदार राहिले. लखनऊ लोकसभा मतदारसंघातून वाजपेयींनी सलग पाच वेळेस विजय मिळवला होता.
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ नऊ वेळेस निवडणूक जिंकणाऱ्या नेत्यांच्या यादीत आहेत. मध्य प्रदेशातील छिंदवाडा मतदारसंघातून त्यांनी 1980 मध्ये पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. एकूण नऊ वेळेस कमलनाथ खासदार राहिले. यानंतर २०१९ मध्ये कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ यांनी छिंदवाडा मतदारसंघातून विजय मिळवला. काँग्रेस नेते दिवंगत माधवराव सिंधिया, खगपती प्रधानी, गिरधर गोमांग, रामविलास पासवान, जॉर्ज फर्नांडिस, माकपा नेते वासुदेव आचार्य आणि माणिकराव गावित या नेत्यांनीही तब्बल नऊ वेळा लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला.
दक्षिणेत भाजपला किती यश मिळणार? वाचा राजकीय रणनितीकार पीके काय म्हणाले
भाजप नेते संतोष गंगवार यांच्या नावावर बरेली लोकसभा मतदारसंघातून आठ वेळा विजयी होण्याचे रेकॉर्ड आहे. सुलतानपूर मतदारसंघातून भाजप नेत्या मेनका गांधी आठ वेळेस विजयी झाल्या आहेत. तर मध्य प्रदेशातील इंदोर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन आठ वेळेस विजयी झाल्या आहेत. मध्य प्रदेशातील मंडला लोकसभा मतदारसंघातून फग्गन सिंह कुलस्ते यांनी सहा वेळेस विजयी होण्याचा मान मिळवला आहे. टीकमगढ मतदारसंघात उमेदवार वीरेंद्र कुमार सात वेळेस जिंकून लोकसभेत पोहोचले आहेत. तर राधा मोहन सिंह सहा वेळचे खासदार आहेत.