दक्षिणेत भाजपला किती यश मिळणार? वाचा राजकीय रणनितीकार पीके काय म्हणाले

दक्षिणेत भाजपला किती यश मिळणार? वाचा राजकीय रणनितीकार पीके काय म्हणाले

Prashant Kishor Estimate on Lok Sabha Elections : निवडणुकीचा अंदाज सांगण्यासाठी प्रशांत किशोर हे रणनीतीकार मानले जातात. त्यामध्ये विधानसा असो किंवा लोकसभा असो या दोन्ही निवडणुकांवर प्रशांत किशोर भाष्य करत असतात. त्यांनी अनेकवेळा निवडणुकांबद्दल व्यक्त केलेले अंदाज खरे ठरले आहेत. दरम्यान, प्रशांत किशोर यांनी सध्या देशात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकंबाबत आपलं भाकीत व्यक्त केलं आहे.

 

काही भागात यश

यामध्ये तेलंगणा, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेशमध्ये भाजपच्या जागा वाढत असल्याचा अंदाज प्रशांत किशोर यांनी व्यक्त केला आहे. तसंच, भाजप पूर्व आणि दक्षिणेत कमकूवत आहे. मात्र, काही दिवसांत पाहिलं तर या भागात भाजपला यश मिळताना दिसत आहे असंही प्रशांत किशोर म्हणाले आहेत.

 

उत्तर भागात जागा कमी होणार नाहीत

दक्षिण भारत आणि पूर्व भारतात मतांची टक्केवारी आणि जागा या दोन्हींमध्ये वाढ होत असल्याचं दिसतं आहे. तामिळनाडूमध्ये भाजपच्या मतांची टक्केवारी वाढणार आहे. या भागाता किती जागा मिळतील किंवा मिळणार नाहीत हे चित्र असलं तरी या भागात मतांची टक्केवारी मात्र वाढेल असंही प्रशांत किशोर म्हणाले आहेत. तसंच, उत्तर आणि पश्चिम भारतात भाजप जास्त जागा गमावणार नाही असंही ते म्हणाले आहेत.

 

कोण आहे प्रशांत किशोर

प्रशांत किशोर हे भारतीय राजकीय रणनीतीकार आणि राजकीय धोरण फर्म इंडियन पॉलिटिकल ऍक्शन कमिटी (IPAC) मार्गदर्शक आहेत. किशोर यांनी 2014 मध्ये भाजपसाठी, 2019 मध्ये तेलंगणात वायएसआर जगन मोहन रेड्डी यांच्यासाठी रणनीती प्रचारात महत्त्वाची भूमिका बजावली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज