भाजपला ‘अब की बार 370 पार ‘अशक्य’, काँग्रेसचं ‘शतक’ हुकणार; प्रशांत किशोर यांचं भाकित काय?
Lok Sabha Election : देशात लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू झाली (Lok Sabha Election) आहे. फाटाफुटीने हैराण झालेल्या इंडिया आघाडीसाठी सध्या (INDIA Alliance) गुडन्यूज येत आहेत. उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीनंतर हरियाणा, दिल्ली, गोवा, चंदीगड आणि गुजरात या राज्यांतही आघाडी झाली आहे. त्यामुळे भाजपसमोर आव्हान उभे राहताना दिसत आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदा 370 पेक्षा जास्त जिंकू असा नारा दिला आहे. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजप खरेच 370 जागांचे उद्दीष्ट गाठणार का आणि काँग्रेस 100 चा आकडा पार करणार का, या प्रश्नांची उत्तर निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishore) यांनी दिली आहेत. भाजप यंदा 370 टार्गेट पार करू शकणार नाही, असे उत्तर प्रशांत किशोर यांनी दिले आहे.
‘इंडिया’मधील पक्षांत ऐक्याचा अभाव, या आघाडीला काहीही भवितव्य नाही; प्रशांत किशोरांची बोचरी टीका
प्रशांत किशोर यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हा अंदाज व्यक्त केला आहे. काँग्रेस यंदा शंभरचा आकडा पार करील का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर किशोर म्हणाले, लोकसभेत काँग्रेसच्या जागांमध्ये फार मोठा बदल होईल असे दिसत नाही. जागांची संख्या 50-55 झाली तरी देशाच्या राजकारणात कोणताही बदल होणार नाही. मोठ्या बदलांसाठी काँग्रेसला 100 चा आकडा पार करावा लागणार आहे. परंतु, आता तसे शक्य दिसत नाही. काँग्रेसच्या निवडणूक निकालात सकारात्मक बदल मला दिसत नाहीत असे प्रशांत किशोर म्हणाले.
भाजप 370 जागांचा आकडा पार करणार का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. भाजपाने आपल्या कार्यकर्त्यांसाठी उद्दीष्ट निश्चित केले आहे. परंतु, लोकांनी हे उद्दीष्ट खरे मानू नये. प्रत्येक नेत्याला आपले ध्येय निश्चित करण्याचा अधिकार आहे. जर त्यांनी उद्दीष्ट साध्य केले तर चांगलीच गोष्ट आहे. परंतु, उद्दीष्ट साध्य झाले नाही तर आपली चूक मान्य करून नम्रपणे वागणूक त्यांना दाखवता आली पाहिजे. 2014 नंतर देशात आठ ते नऊ निवडणुका अशा झाल्या ज्यामध्ये भाजपला त्यांनी निश्चित केलेले उद्दीष्ट गाठता आले नाही. या निवडणुकीत भाजप 370 जागांपर्यंत पोहोचण्याची शक्यता दिसत नाही.
Assembly Election : कोण बाजी मारणार? प्रशांत किशोर यांनी सांगितला 5 राज्यांचा ‘मूड’
पश्चिम बंगालमध्ये 2019 च्या (West Bengal) निवडणुकीत भाजपने चांगली कामगिरी केली होती. राज्यातील 42 जागांपैकी 18 जागांवर विजय मिळवला होता. त्यामुळे यंदाही भाजप पश्चिम बंगालमध्ये चांगली कामगिरी करील. त्यांच्या जागा कमी होण्याची शक्यताा दिसत नाही, असा अंदाज प्रशांत किशोर यांनी व्यक्त केला.