Download App

Naveen Patnaik : राजकारणाने बदलला पोशाख, जीन्स घालणारे ‘पटनायक’ बनले खादीधारी

नवीन पटनायक राजकारणात येण्याआधी उत्तम लिखाण करत होते त्यांचा पेहरावही जीन्स पँट आणि टी शर्ट असाच असायचा. पण राजकारणात आले आणि खादीधारी बनले.

Naveen Patnaik : राजकारणी नेता पाहिला की त्याचा पेहराव खादीचा पांढरा कुर्ता आणि पायजमा असाच दिसतो. भारतीय राजकारणाचं ते एक वेगळेपणच म्हणावं लागेल. सुटाबुटातला आणि जीन्स पँट टी शर्टमधला नेता आपल्याकडे क्वचितच दिसेल. नेत्यांच्या वैयक्तिक आयुष्यात किंवा त्यांच्या राजकारणात येण्याआधी ते असा पेहराव करत असतीलही पण राजकारणात आल्यानंतर त्यांची इमेज अशीच झालेली दिसते. याचं उदाहरण म्हणून ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्याकडे (Naveen Patnaik) पाहता येईल. पटनायक राजकारणात येण्याआधी उत्तम लिखाण करत होते त्यांचा पेहरावही जीन्स पँट आणि टी शर्ट असाच असायचा. पण राजकारणात आले आणि खादीधारी बनले. एका अर्थाने राजकारणाने त्यांचा लिबास बदलला असे म्हणता येईल.

ओडिशा राज्यात लोकसभा निवडणुकीबरोबरच विधासभा निवडणुका होत आहेत. मागील दोन दशकांपासून नवीन पटनायक राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आता नवीन पटनायक यांनी पुन्हा निवडणुका जिंकल्या तर मुख्यमंत्री पदाच्या रूपात कदाचित ही त्यांची शेवटची निवडणूक असेल. पटनायक यांच्यानंतर माजी नोकरशहा व्ही.के. पांडीयन हेच त्यांचे उत्तराधिकारी असतील. कारण राजकारणात त्यांनी घराणेशाही तयार केलेली नाही. यंदा जर नवीन पटनायक पुन्हा मुख्यमंत्री बनले तर पवन कुमार चामलिंग यांचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचे रेकॉर्ड तुटेल.

लोकसभा निवडणूक कोण जिंकणार? प्रशांत किशोरनंतर योगेंद्र यादवांचं मोठं भाकित…

नवीन पटनायक राजकारणात अपघातानेच आले असेच म्हणावे लागेल. कारण राजकारणापेक्षा त्यांना कला संस्कृती आणि लिखाणाची आवड होती. 17 एप्रिल 1997 रोजी बिजू पटनायक यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने अस्का लोकसभा मतदारसंघ रिक्त झाला. त्यामुळे या मतदारसंघात पोट निवडणुकीची घोषणा झाली. या जागेसाठी जनता दलाने आधी बिजू पटनायक यांचे थोरले पुत्र प्रेम पटनायक यांना उमेदवारी देण्याचा आग्रह धरला. परंतु त्यांनी आपला व्यवसाय आणि वैयक्तिक कारणांचा हवाला देत निवडणूक लढण्यास नकार दिला.

त्यांच्या नकारानंतर बिजू पटनायक यांची मोठी मुलगी गीता मेहता यांच्या नावाचा विचार सुरू झाला. मात्र गीता मेहता त्यावेळी अमेरिकेत होत्या. मग प्रेम पटनायक यांचे बंधू नवीन पटनायक यांच्या नावावर चर्चा झाली. पटनायक कुटुंब राजकारणात असलं तरी नवीन पटनायक मात्र कला संस्कृती आणि लेखनात मग्न असायचे. त्याकाळी नवीन पटनायक जीन्स पँट आणि टी शर्ट वापरायचे. पण राजकारणात आल्यानंतर मात्र त्यांचा पोशाख देखील बदलला. कुर्ता आणि पायजमा हाच त्यांचा पोशाख झाला.

VIDEO: पाककडील अणुबॉम्बवर मोदींचे खास स्टाईलने उत्तर, मी स्वतः लाहोरला जावून तपासून आलोय…

इंदिरा गांधींचे पुत्र संजय गांधींबरोबर शिक्षण

वडिलांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेवर त्यांनी निवडणूक लढली आणि विजयी झाले. पुढे 1997 मध्ये जनता दलापासून फारकत घेत त्यांनी बिजू जनता दल पक्षाची स्थापना केली. नवीन पटनायक यांचे सुरुवातीचे शिक्षण नामी दून हायस्कूलमध्ये झाले. या शाळेत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांच्या बरोबर त्यांनी शिक्षण घेतले. सन 2000 मध्ये काँग्रेसला सत्तेतून बेदखल केल्यापासून ते राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कायम आहेत. आता ओडिशात यंदा निवडणुकीत मुख्य लढत भाजप आणि बिजू जनता दल यांच्यातच आहे. लोकसभा निवडणुकीत बिजद बरोबर युती करण्याचा भाजपाचा विचार होता. परंतु हा विचार प्रत्यक्षात येऊ शकला नाही.

नवीन पटनायक बालपणी शक्यतो ओडिशा बाहेरच जास्त काळ राहिले. याचा परिणाम त्यांच्या मातृभाषेवरही झाला. पटनायक यांना आजही उडिया भाषा लिहिण्यात, बोलण्यात आणि वाचण्यात अडचणी जाणवतात. विद्यार्थीदशेत त्यांचे सहपाठी आणि मित्र त्यांना प्रेमाने पप्पू या नावाने हाका मारत असत. त्यांच्या तारुण्याचा बराचसा काळ न्यूयॉर्कमध्ये गेला. इंग्रजी भाषेवर त्यांचे चांगले प्रभुत्व आहे. नवीन पटनायक यांनी लग्न केलेले नाही.

follow us

वेब स्टोरीज