Lok Sabha Election : लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या (Lok Sabha Election) असतानाच इंडिया आघाडीला मोठे धक्के बसले (INDIA Alliance) आहेत. ममता बॅनर्जी, नितीश कुमार यांच्यानंतर आम आदमीनेही झटके देण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीत फक्त एक जागा देऊन इशारा दिल्यानंतर आणखी एक झटका दिला आहे. जागावाटप आणि प्रचार रणनीतीवर चर्चा करण्याऐवजी काँग्रेस भारत जोडो न्याय यात्रेत गुंतली आहे. त्यामुळे कंटाळून अखेर आम आदमी पार्टीने दक्षिण गोवा आणि गुजरातमधील दोन उमेदवारांची घोषणा केली.
गुजरात राज्यात लोकसभेच्या 26 जागा आहेत. त्यातील 8 जागा लढण्याची तयारी आम आदमी पार्टीने केली आहे. तर काँग्रेससाठी 18 जागा सोडण्याचा विचार आहे. आम आदमी पार्टीने गुजरातमधील भरुचमधून चैतर वसावा, भावनगरमधून उमेशभाई मकवाना यांना तिकीट देण्याची घोषणा केली आहे. दक्षिण गोवा मतदारसंघातून आप आमदार वेंझी वेगास यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
Arvind Kejriwal : दिल्लीत फक्त एक जागा; जागावाटपाच्या फॉर्म्युल्यासह AAP ने काँग्रेसला दिली डेडलाईन
मागील काही दिवसांत इंडिया आघाडीला तीन मोठे झटके बसले आहेत. सर्वात आधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी बंगालमध्ये स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा केली होती. त्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार(Nitish Kumar) यांनीही आघाडीला धक्का एनडीएत वापसी केली. उत्तर प्रदेशात आरएलडी प्रमुख जयंत चौधरी (Jayant Chaudhary) यांनीही भाजपाच्या नेतृत्वातील एनडीए आघाडीसोबत जाणार असल्याचे सांगितले.
लोकसभा निवडणुकीत भाजपला कडवे आव्हान देण्यासाठी दोन डझनहून अधिक विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. त्यांनी इंडिया नावाची आघाडी स्थापन केली. पण, त्या आघाडीच्या एकजुटीची गाठ सुटू लागल्याचं चित्र आहे. त्या आघाडीला ममतांनी पहिला धक्का दिला. त्यांनी बंगालमध्ये एकला चलो रे घोषणा केली. नितीश यांनीही इंडियाशी फारकत घेतली. ते पुन्हा भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये सामील झाले. आता केजरीवाल यांनी पंजाबमध्ये आणि दिल्लीत आम आदमी पार्टी काँग्रेससोबत हातमिळवणी करणार नसल्याचे स्पष्ट केलं.
Lok Sabha 2024 : ‘यूपी’त ‘इंडिया’ला धक्का, मोठा नेता साथ सोडणार?; शिवपाल यादवांनी स्पष्टच सांगितलं
जयंत चौधरींचाही झटका
समाजवादी पार्टीने (Samajwadi Party) जो जागावाटपाचा फॉर्म्यूला दिला आहे त्यावर जयंत चौधरी चांगलेच नाराज झाले आहेत. सपाने आरएलडीला (RLD) सात जागा देण्याची घोषणा केली आहे. यापैकी चार जागा अशा आहेत जिथे सपाच्या उमेदवारांना आरएलडीच्या चिन्हावर निवडणूक लढण्यास सांगण्यात आले होते. त्यामुळे आरएलडीचे कार्यकर्ते आणि जाट मतदारांमध्ये नाराजी पसरली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत आरएलडीने तीन जागांवर उमेदवार दिले होते मात्र, या तिन्ही जागांवर त्यांचा पराभव झाला होता.