Download App

विरोधकांच्या गोटात खळबळ! काँग्रेसच्या खेळीमुळे नितीश कुमारांनी ‘तो’ निर्णयच बदलला

Opposition Meeting : केंद्रातील सत्ताधारी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याविरोधात रणनिती तयार करणाऱ्या विरोधी पक्षांना आणखी एक झटका बसला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर यासंदर्भात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी पाटण्यात येत्या 12 जून रोजी विरोधी पक्षांची मोठी बैठक बोलावली होती. मात्र ही बैठक पुढे ढकलली असून 23 जून रोजी होण्याची शक्यता आहे. नितीश कुमार यांनी स्वतः याबाबत माहिती दिली.

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) हे बैठकीस उपस्थित राहतील की नाही याची काहीच खात्री नव्हती. हे दोन्ही नेते बैठकीस उपस्थित राहणार नाहीत हे काँग्रेसने आधीच सांगितले होते. दुसरीकडे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांच्याऐवजी द्रमुक प्रतिनिधी बैठकीला हजर राहतील असे कळविण्यात आले होते. आता मात्र बैठकच पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे आता तरी हे महत्वाचे नेते बैठकीस उपस्थित राहतील का, असा प्रश्न विचारला जात आहे.

Odisha Train Accident : देव तारी त्याला कोण मारी! बापाने पोटच्या गोळ्याला मृतांच्या यादीतून जिवंत शोधलं…

विरोधकांच्या या संयुक्त बैठकीत पक्षाचे आघाडीचे नेते हजर असावेत अशी इच्छा नितीश कुमार यांनी व्यक्त केली आहे. दुसऱ्या किंवा तिसऱ्या फळीतील नेते सहभागी झाल्यास बैठकीचे गांभीर्य कमी होईल, असे त्यांनी सांगितले.

आता ही बैठक 23 जून रोजी होण्याची शक्यता आहे. मात्र या बैठकीत राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे उपस्थित राहतील का हा प्रश्नच आहे. हे नेते बैठकीला हजर राहणार नाहीत. पण, काँग्रेसचे प्रतिनिधीत्व असावे म्हणून काँग्रेसशासित राज्याचा मुख्यमंत्री बैठकीला हजर राहिल असे काँग्रेसने सांगितले होते. त्यामुळे विरोधकांच्या एकीला आधीच झटका बसला आहे.

दरम्यान, देशातील सर्वात जुना पक्ष आणि सध्या प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने घेतलेला हा निर्णय नितीश कुमार यांच्यासाठी मोठा झटका असल्याचे मानले जात आहे. नितीश कुमार यांनी जेव्हा राहुल गांधी आणि खर्गे यांची भेट घेतली होती त्यावेळी कर्नाटक निवडणुकीचे निकाल लागले नव्हते. या निवडणुकीत मिळालेल्या शानदार विजयानंतर काँग्रेसच्या वागणुकीत अचानक बदल झाला. पार्टीतील बहुतांश नेते राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार बनविण्याच्या बाजूने आहेत. त्यांचे असे म्हणणे आहे, की भारत जोडो यात्रेमुळे राहुल यांच्या लोकप्रियतेत वाढ झाली आहे. कर्नाटकातील विजय हा त्याचाच परिणाम आहे.

Opposition Meeting : नितीश कुमारांचा प्लॅन, ममतांचीही साथ पण, काँग्रेसने खेळच पलटविला!

विपक्षी एकतेच्या मुद्द्यावर नितीश कुमार जितकी घाई करत तितकीच काँग्रेस या मुद्द्यावर शांत आहे. काँग्रेस सध्या लोकसभा निवडणुकीतील जागावाटप किंवा पंतप्रधानपदासाठी कोणत्या दुसऱ्या नेत्याच्या नावावर विचार करण्यास तयार नाही, अशी माहिती काँग्रेसमधील सूत्रांकडून मिळाली.

Tags

follow us