Odisha Train Accident : देव तारी त्याला कोण मारी! बापाने पोटच्या गोळ्याला मृतांच्या यादीतून जिवंत शोधलं…

Odisha Train Accident : देव तारी त्याला कोण मारी! बापाने पोटच्या गोळ्याला मृतांच्या यादीतून जिवंत शोधलं…

Odisha Train Accident : Odisha Train Accident : देव तारी त्याला कोण मारी हे अगदी खरंय. आपल्या जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूची बातमी समजताच आपण तो जिवंत असल्याची शाश्वता ठेवत नाही. तो मृत झालाय यावर विश्वास ठेवतो, पण कोलकाताच्या एका दुकानदाराला आपला मुलगा बालासोरच्या दुर्घटनेत मृत झालाय, यावर विश्वास बसला नाही. मुलगा जिवंत असल्याचं मानत त्यांनी मुलाला शवगृहात त्याला शोधलं. हेलराम मलिक असं या बापाचं नाव आहे. त्यांनी आपल्या मुलाला जिवंत शोधून काढलं आहे.

‘2019 मध्ये शिवसेनेशी युती केली तिथं भाजपचं चुकलंच’; विनोद तावडेंनी दिली जाहीर कबुली

घटनेची माहिती समजताच त्याने बालासोर गाठून रुग्णालये, रुग्णवाहिका, मृतदेहांच्या खचात आपल्या 24 वर्षीय मुलाला शोधलं पण यश आलं नाही. अनेकांनी तो मृत झाला असल्याचं सांगितलं पण मुलगा जिवंत असल्याचा विश्वास त्याला होता. अखेर बापाच्या शेवटच्या प्रयत्नाचं सार्थक झालं. त्याने शवविच्छेदन गृहातील मृतदेहांच्या खचातून आपल्या मुलाला त्याने शोधून बाहेर काढलं, त्याचवेळी मुलाचा हात हलताना पाहताच त्यांनी मुलाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं.

Shivrajyabhishek Din : लोकसभेची भीती, मोदींचा मौल्यवान वेळ; शिंदे सरकारचं अ‍ॅडव्हान्स सेलिब्रेशन

विश्वजीत मलिक असं या मुलाचं नाव असून अपघातानंतर विश्वजीतची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर त्यानंतर आता पुन्हा एकदा शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. विश्वजीत अपघातात गंभीर जखमी झाला होता. परंतु आता त्याची प्रकृती स्थिर आहे.

Wrestlers Protest: ब्रिजभूषण विरुद्ध दोन एफआयआर, विनयभंगासह 10 गुन्हे, जाणून घ्या या कलमांमध्ये किती शिक्षा

विश्वजीतचा शोध कसा लागला?
घटनेबद्दल जेव्हा समजलं तेव्हा हेलराम मलिकांनी हार मानली नाही. हेलराम मलिक जेव्हा विश्वजीतचा शोध घेत असतानाच त्यांना एका व्यक्तीने शवगृहात शोधण्याचा सल्ला दिला. त्यांना सुरुवातीला ही गोष्ट मान्य करण्यास वेळ लागला पण ते जेव्हा शवगृहात विश्वजीतला शोधण्यासाठी गेले तेव्हा त्यांच्या डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच पडला होता.

सहा महिने जातो, निधी आणतो अन् परत येतो; जयंत पाटलांनी सांगितली शिंदे गटातील प्रवेशाची बात

विश्वजीतचे वडिलांनी सांगितली हकीकत :
शवगृहात गेल्यानंतर आम्हाला समजलं की तिथल्या एका मृतदेहाचा हात हलत होता. त्यानंतर शवगृहात एकच गोंधळ उडाला. आम्ही तिथेच असल्यामुळे ही सर्व घटना पाहत होतो. जेव्हा आम्ही तो हात हलताना पाहिले तेव्हा आमच्या लक्षात आलं, हा हात विश्वजीतचाच आहे. विश्वजीत अतिशय गंभीर अवस्थेत आढळून आला. आम्ही तात्काळ त्याला रुग्णवाहिकेमधून बालासोरच्या रुग्णालयात आणले. त्यानंतर तिथे त्याच्यावर उपचार करण्यात आले.

दरम्यान, ओडिशामधील बालासोरमध्ये झालेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर ह्रदयद्रावक दृश्य पाहायला मिळाली आहेत. भारताच्या इतिहासातल सर्वात मोठा हा रेल्वे अपघात असल्याचं बोललं जात आहे. या दुर्घटनेनंतर विश्वजीतच्या वडिलांसारखेच कुणी ,आई, बहिण, मुलगा, वडिल तर कोणी नातेवाईचा शोध घेण्यासाठी पराकाष्टा करीत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube