New Parliament : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) येत्या 28 मे रोजी नव्या संसद भवनाचे उद्घाटन करणार आहेत. या संसद भवनाची जितकी चर्चा होत आहे तितकीच चर्चा उद्घाटनाच्या तारखेचीही होत आहे. त्याचे कारणही तितकेच खास आहे. 28 मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर (V. D. Savarkar) यांची जयंती आहे आणि याच दिवशी पीएम मोदी संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन करतील. आता अशी चर्चा सुरू झाली आहे की हा निव्वळ योगायोग आहे की भाजपाचा काही राजकीय प्लॅन.
28 तारखेचा योगायोग की मास्टस्ट्रोक
तसे पाहिले तर भाजप (BJP) सावरकरांना नेहमीच एक नायकाच्या रुपात मानत आला आहे. याचे कारण म्हणजे भाजपच्या राष्ट्रवादासह हिंदुत्वाला सोबत घेत राजकारणात आपली पकड घट्ट करत आहे. अशा वेळी सावरकर भाजपला जास्त फायदेशीर ठरतात. भाजपाच्या काही नेत्यांनी तर सावरकरांना भारतरत्न देण्याचीही मागणी केली आहे. सावरकरांच्या जयंती दिनीच संसद भवनाचे उद्घाटन करून भाजप सावरकरांना पुन्हा चर्चेत आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे बोलले जात आहे. या रणनितीला राहुल गांधी आणि काँग्रेसला (Congress) सणसणीत उत्तराच्या रुपातही पाहिले जात आहे.
Chief Minister of Karnataka : सिद्धरामय्या मुख्यमंत्री होण्यामागचं ‘पंचामृत’…
निवडणुकांवर भाजपाचा डोळा ?
महाराष्ट्राच्या राजकारणात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे मोठे नाव आहे. त्यामुळेच तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेना, काँग्रेसबरोबर आघाडीत असतानाही सावरकरांच्या बाबतीत कोणतीच तडजोड करण्यास तयार नाही. राज्यात लवकरच निवडणुका होणार आहेत. मागील काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने ज्या प्रकारे शिंदे फडणवीस सरकारवर प्रश्न उपस्थित केले त्यावरून राज्यात उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळू शकते. त्यामुळे आगामी काळातील संभाव्य घडामोडींचा अंदाज घेत भाजप आतापासूनच सावरकरांच्या मदतीने राज्याचे राजकारण साधण्याचा प्रयत्न करत आहे.
सावरकरांवरच चर्चा का ?
संसदेचे मागील सत्रात नुसताच गदारोळ झाला. काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी अदानी प्रकरणात जेपीसीची मागणी करत होते. तर सरकार राहुल गांधींच्या (Rahul Gadnhi) वक्तव्यावरून माफीची मागणी करत होते. या दरम्यान मानहानीच्या प्रकरणात राहुल गांधींना सूरत न्यायालयाने शिक्षा सुनावली. त्यावेळी राहुल यांनी मी गांधी आहे, सावरकर नाही असे म्हणत माफी मागण्यास नकार दिला.
खासदार ड्रायव्हर, मंत्री गाडीत तरीही बागेश्वर बाबाला दणका बसलाच; पोलिसांची कारवाई
याआधी 2019 मध्ये जेव्हा राहुल गांधींनी मोदींवर टिप्पणी केली होती त्यावेळीही भाजपने माफीची मागणी केली होती. राहुल यांनी त्यावेळी सुद्धा माझे नाव राहुल गांधी आहे, राहुल सावरकर नाही असे म्हणत माफी मागण्यास नकार दिला होता. राहुल गांधी यांनी यााधीही सावरकर आणि आरएसएसवर आरोप केले होते. भारत जोडो यात्रेदरम्यान त्यांनी आरोप केला होता की सावरकर यांनी इंग्रजांची मदत केली होती.