खासदार ड्रायव्हर, मंत्री गाडीत तरीही बागेश्वर बाबाला दणका बसलाच; पोलिसांची कारवाई

खासदार ड्रायव्हर, मंत्री गाडीत तरीही बागेश्वर बाबाला दणका बसलाच; पोलिसांची कारवाई

Traffic Police Action on Baba Bageshwar :  बिहारमध्ये सध्या बागेश्वर धामचे (Bageshwar Dham) धीरेंद्र शास्त्री यांची जोरदार चर्चा होत आहे. बिहारचे राजकारण आणि नागरिकांत जशी चर्चा आहे तसे आणखी एका कारणामुळे बाबा चर्चेत आले आहेत. फक्त धीरेंद्र शास्त्रीच नाही तर त्यांच्याबरोबर केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह (Girirraj Singh) आणि भाजप नेते मनोज तिवारी (Manoj Tiwari) यांचीही चर्चा होत आहे. त्याचे कारणही तसेच खास आहे. हे तिघेही ज्या कारमधून चालले होते त्या वाहनाला वाहतूक पोलिसांनी दंड ठोठावला आहे.

धीरेंद्र कृष्ण शास्त्री ज्या वाहनातून पाटणा विमानतळावरून हॉटेलपर्यंत आले होते, त्या वाहनावर कारवाई करण्यात आली. या वाहनात बागेश्वर बाबा यांच्यासोबत मनोज तिवारी आणि गिरीराज सिंह देखील होते. मनोज तिवारी स्वतः ड्रायव्हिंग करत होते केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह मागच्या सीटवर बसले होते.

9 Years of Modi Government : ऐतिहासिक कार्यकाळातील 9 वादळी निर्णयांचा आढावा

विमानतळावरून हॉटेलमध्ये जाताना या तिघांनीही सीट बेल्ट बांधला नव्हता. याची तक्रार वाहतूक शाखेकडे आली होती. त्यानंतर पोलिसांनी चौकशी केली. खात्री झाल्यानंतर कारवाई करत दंड ठोठावण्यात आला. वाहतूक विभागाचे एसपी पूरन झा यांनी या कारवाईला दुजोरा दिला आहे. मात्र किती रकमेचा दंड करण्यात आला याची खात्री झालेली नाही.

याबाबत आधिक माहिती देताना झा म्हणाले, बागेश्वर बाबा ज्या दिवशी पाटण्याला आले होते. त्यादिवशी हॉटेलकडे निघताना कारमध्ये कोणीही सीटबेल्ट घातला नव्हता, अशी तक्रार आम्हाला मिळाली होती. त्यानंतर आम्ही सीसीटीव्ही फुटेच चेक केले. त्यामध्ये कोणीच सीटबेल्ट घातला नसल्याचे आढळून आले. याआधारे आम्ही कारवाई केली.

एमपी 16 सी 5005 या वाहनाची मध्य प्रदेशातील छतरपूर येथील नोंदणीकृत आहे. ऑनलाइन नोंदीनुसार 25 एप्रिल 2015 रोजी या आलिशान कारचे नियंत्रित प्रदूषण प्रमाणपत्र 28 सप्टेंबर 2020 रोजी संपले असल्याचे सांगण्यात आले. यावरही वाहतूक पोलिसांनी कारवाई केली.

एक फोन, 1070 कोटींची खबर अन् पोलिसांचीही तंतरली… भर रस्त्यात काय घडलं?

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube