‘आताचे दिवस आणीबाणीपेक्षाही वाईट’; केजरीवालांना पाठिंबा देत KCR मोदींवर बरसले

Delhi Govt vs Centre Ordinance row : केंद्र सरकारने राजधानी दिल्लीतील बदल्या आणि पोस्टिंगसंदर्भात आणलेला अध्यादेश राज्यसभेत हाणून पाडण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल देशभरात दौरा करत आहेत. महाराष्ट्रातील नेत्यांच्या भेटी घेतल्यानंतर त्यांनी आज तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भेट घेतली. या भेटीनंतर मुख्यमंत्री राव यांनी मोदी सरकारने हा अध्यादेश तत्काळ मागे घ्यावा असे सांगितले. […]

Chandrashekhar Rao

Chandrashekhar Rao

Delhi Govt vs Centre Ordinance row : केंद्र सरकारने राजधानी दिल्लीतील बदल्या आणि पोस्टिंगसंदर्भात आणलेला अध्यादेश राज्यसभेत हाणून पाडण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल देशभरात दौरा करत आहेत. महाराष्ट्रातील नेत्यांच्या भेटी घेतल्यानंतर त्यांनी आज तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भेट घेतली. या भेटीनंतर मुख्यमंत्री राव यांनी मोदी सरकारने हा अध्यादेश तत्काळ मागे घ्यावा असे सांगितले.

राव म्हणाले, भारतीय जनता पार्टीचे नेते नेहमीच घसा ताणून आणीबाणीच्या विरोध बोलत असतात. आणीबाणीचे काळे दिवस म्हणत असतात. आता तुमचे तरी कोणते अच्छे दिन आहेत. हे काय अच्छे दिन आहेत का, हे तर आणीबाणीतील काळ्या दिवसांपेक्षाही वाईट दिवस आहेत. लोकांनी निवडून दिलेल्या दिल्ली सरकारला तुम्ही कामकाज करण्यापासून रोखत आहात. तुम्ही जर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करू शकत नसाल तर काय करणार, असा सवाल राव यांनी उपस्थित केला.

देशातील जनता तुम्हाला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. आताच कर्नाटकच्या निवडणुकीत लोकांनी धडा शिकवलाच आहे. आता संपूर्ण देशभरातील जनता तुम्हाला धडा शिकविल असा इशारा त्यांनी भाजपला दिला.

याआधी जसे तुम्ही कृषी कायदे, भूमी अध्यादेश कायदा मागे घेतला होता. तु्म्ही (नरेंद्र मोदी) तर माफीचे सौदागर आहात त्यामुळे स्वतःहून हा अध्यादेश मागे घ्यावा तेच चांगले राहिल असे राव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून म्हणाले.

तुम्ही जे युद्ध सुरू केले आहे ते चुकीचेच आहे. राजकारणात आम्ही तुमच्यासोबतच आहोत. तुमचे समकालीन सहकारी सुद्धा आहोत त्यामुळे तुम्हाला सल्लाही देत आहोत की हे जे काही चालले आहे ते ना तुमच्यासाठी चांगले आहे ना देशासाठी ना देशातील लोकशाहीसाठी. त्यामुळे अधिक वेळ वाया न घालवता केंद्र सरकारने तत्काळ हा अध्यादेश मागे घ्यावा, अशी मागणी करत जर निर्णय घेतला गेला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा राव यांनी दिला.

मोदींना नाकारलं, 83 टक्के नागरिकांना वाटतं, संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते करावं

दरम्यान, याआधी केजरीवाल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या कारभारावर टीका केली. तसेच या अध्यादेशाविरोधात आम आदमी पार्टीला सहकार्य करणार असल्याचे पवार आणि ठाकरे यांनी सांगितले.

Exit mobile version