Download App

Farmer Protest : “चलो दिल्ली” मार्च स्थगित; आज टोलनाका बंद करणार शेतकरी

Farmer Protest : पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांचे आंदोलन आता (Farmer Protest) चिघळले आहे. केंद्र सरकाबरोबर चर्चा फिस्कटल्यानंतर काल शेतकरी संघटनांनी राजधानी दिल्लीच्या दिशेने कूच सुरू केले. मात्र या आंदोलना दरम्यान पोलीस आणि शेतकऱ्यांत संघर्ष उडाला. या संघर्षात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची अफवा उडाली. त्यामुळे आंदोलक प्रचंड संतापले आहेत. पंजाब हरियाणा सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, शेतकरी नेत्यांनी चलो दिल्ली मार्च दोन दिवस स्थगित ठेवला आहे. आंदोलनाची पुढील दिशा शुक्रवारी सायंकाळी ठरवणार असल्याचे शेतकरी नेते सरवनसिंह पंधेर म्हणाले.

शेतकरी आंदोलनाचा आज दहावा दिवस आहे. शेतकरी सध्या शंभू-खनौरी बॉर्डरवर जमा झाले आहेत. संयुक्त किसान मोर्चाची आज महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत पुढील रणनीतीवर चर्चा केली जाणार आहे. भारतीय किसान युनियन गुरनाम सिंह चढूनी गटाने आज रेवाडी टोल प्लाजा बंद करण्याची घोषणा केली आहे. हा टोल नाका दुपारी 12 ते 2 यावेळेत बंद केला जाणार आहे.

Farmer Protest : सरकारचा ‘तो’ प्रस्ताव धुडकावला, उद्यापासून ‘चलो दिल्ली’; शेतकरी नेत्यांचा प्लॅन तयार

शंभू खनौरी बॉर्डरवर शेतकऱ्यांवर बळाचा वापर केल्याप्रकरणी शेतकऱ्यांनी केंद्र सरकार आणि हरियाणाच्या कर्मचाऱ्यांवर संताप व्यक्त केला. हरियाणाच्या सुरक्षा जवानांनी पंजाबच्या हद्दीत त्यांच्या छावणीत प्रवेश केल आणि अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, असा आरोप एका शेतकऱ्याने केला. या घटनेत जवळपास शंभर शेतकरी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. याआधी पाच पिकांना एमएसपी देण्याचा केंद्राचा प्रस्ताव शेतकरी संघटनांनी धुडकावून लावला.

सरकारने 23 पिकांना एमएसपी (MSP) द्यावी अशी मागणी संघटनांनी केली आहे. या घडामोडींनंतर शेतकरी संघटनांनी काल दिल्लीकडे जाण्यास सुरुवात केली. मात्र, या दरम्यान पोलीस आणि शेतकऱ्यांत संघर्ष उडाला. आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रूधुराचा वापर करण्यात आला. सध्या येथील परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. शेतकरी संघटनांनी दोन दिवस दिल्ली मार्च स्थगित केला आहे. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनीही सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी कायमच तयार असल्याचे सांगितले आहे.

शेतकरी आंदोलनावेळी मोदी सरकारने ट्विटरला धमकावलं; माजी सीईओच्या दाव्याने खळबळ!

ऊस खरेदी दरात 25 रुपये वाढ 

शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान (Farmer Protest) मोदी सरकारने ऊस खरेदी दरात वाढ केली आहे. उसाच्या दरात (Sugarcane rates) आठ टक्के वाढ केल्याचे जाहीर करण्यात आले आहे. सध्या 315 रुपये प्रतिक्विंटल असलेल्या उसाला आता 340 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळणार आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी सरकारच्या या घोषणेबाबत दिली आहे.

follow us

वेब स्टोरीज