शेतकरी आंदोलनावेळी मोदी सरकारने ट्विटरला धमकावलं; माजी सीईओच्या दाव्याने खळबळ!

शेतकरी आंदोलनावेळी मोदी सरकारने ट्विटरला धमकावलं; माजी सीईओच्या दाव्याने खळबळ!

Twitter : देशभरात गाजलेले शेतकरी आंदोलन मोदी सरकारने ज्या पद्धतीने हाताळले त्याबाबत आता नवनवीन खुलासे होऊ लागले आहेत. ट्विटरचे (Twitter) माजी सीईओ जॅक डॉर्सी (Jack Daorsey) यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. शेतकरी आंदोलनावेळी सरकारकडून ट्विटर बंद करण्याची आणि छापेमारीची धमकी देण्यात आली होती, असा दावा डॉर्सी यांनी केला.

केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनावेळी सरकारने अनेक ट्विटर अकाउंट ब्लॉक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. दबाव टाकला जात होता. डॉर्सी यांच्या दाव्यावर केंद्र सरकारनेही प्रतिक्रिया दिली आहे. हा जो दावा केला जात आहे तो पूर्णपणे खोटा आहे. डॉर्सी खोटे बोलत आहेत. ट्विटरने भारतीय कायद्यांचे वारंवार उल्लंघन केले आहे.

Biporjoy Cyclone : बिपरजॉय चक्रीवादळामुळे गुजरात किनारपट्टी भागात ऑरेंज अलर्ट…

2020 ते 2022 पर्यंत ट्विटरने वारंवार भारतीय कायद्यांचे उल्लंघन केले. त्यानंतर जून 2022 मध्ये त्यांनी या कायद्यांचे पालन केले. कोणीही तुरुंगात गेले नाही आणि ट्विटरही डाऊन झाले नाही. एका मुलाखतीदरम्यान जॅक डॉर्सींना हा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी हा खळबळजनक दावा केला. त्यांच्या या दाव्यांनंतर भारतीय राजकारणात वादळ उठले आहे. विरोधकांनी भाजपला घेरले आहे. आरोप प्रत्यारोपांचे राजकारण सुरू झाले आहे.

भाजपचे काँग्रेसला सवाल 

भारतीय जनता पार्टीचे सोशल मीडिया प्रमुख अमित मालवीय यांनी काँग्रेसला काही प्रश्न विचारले. काँग्रेस आणि विपक्ष या खोट्या दाव्यांमुळे इतके उत्साहित का होत आहेत? भारताविरोधात वक्तव्ये करणाऱ्यांसोबत जाण्याचे काय कारण आहे?

काँग्रेस आमदाराचा दिव्य प्रताप; बसचा रिव्हर्स गिअर टाकत गाड्यांचा केला चक्काचूर

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube