Karnataka Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने कर्नाटकात (Karnataka Lok Sabha Election) उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत वीस उमेदवारांना तिकीट देण्यात आले. आता मात्र याच यादीवरून भाजपात वाद सुरू झाले आहेत. कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री केएस ईश्वरप्पा (KS Eshwarappa) हावेरी लोकसभा मतदारसंघातून आपल्या मुलासाठी तिकीटाची मागणी करत होते. मात्र पक्षाने त्यांच्याकडे दुर्लक्ष करत माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना उमेदवारी दिली. यामुळे ईश्वरप्पा कमालीचे नाराज झाले आहेत. या नाराजीतच त्यांनी माजी मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा यांचा मुलगा बीवाय विजयेंद्र यांच्या विरोधात निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. भाजपने विजयेंद्र यांना शिवमोगा मतदारसंघातून तिकीट दिले आहे.
Karnataka : कर्नाटकात राडा! ‘इंग्रजी’ फलकांची तोडफोड; ’60 टक्के कन्नड’च्या आदेशाचा वाद पेटला
पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना ईश्वरप्पा म्हणाले, कर्नाटकात भाजपाची स्थिती चांगली नाही. कर्नाटकातील नागरिक आणि पार्टी कार्यकर्ते भाजपाच्या बाजूने आहेत मात्र येथील व्यवस्था खराब आहे. मोदीजी म्हणतात काँग्रेस पार्टी एका परिवाराच्या हातात आहे. कर्नाटकातही भाजपाची परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही. कर्नाटक भाजपावरही एकाच परिवाराचा ताबा आहे. त्यामुळे आता याचा विरोध करावा लागणार आहे.
कर्नाटकात आणखीही काही नेते बंडखोरी करण्याच्या तयारीत असल्याचे समजते. यामध्ये माजी मुख्यमंत्री सदानंद गौडा, कराडी संगन्ना, जेसी मधुस्वामी हे नेते भाजपाची डोकेदुखी निवडणुकीच्या काळात वाढवू शकतात अशी चिन्हे दिसत आहेत.
पुण्यात भाजपला धक्का! माजी खासदार गिरीश बापट यांचे निकटवर्तीय शरद पवार गटात
भाजपच्या पहिल्या यादीचा विचार केला तर यामध्ये 195 उमेदवारांना तिकीट देण्यात आले होते. यामध्ये 33 खासदार असे आहेत की ज्यांना पुन्हा तिकीट मिळाले नाही. 110 खासदारांना मात्र पुन्हा संधी मिळाली. उर्वरित मतदारसंघात कुणाच्याही चर्चेत नसलेल्या नवीन चेहऱ्यांना निवडणूक रिंगणात उतरवण्यात आले. दुसऱ्या यादीत भाजपने बऱ्यापैकी संतुलन साधले आहे. 30 उमेदवारांना रिपीट करण्यात आले तर 30 खासदारांना संधी नाकारली. या व्यतिरिक्त 12 नव्हं नवीन उमेदवारांना मैदानात उतरवले आहे.