Download App

Karnataka Politics : कर्नाटकात पुन्हा ऑपरेशन लोटस? मुख्यमंत्र्यांच्या नव्या दाव्याने खळबळ!

Karnataka Politics : देशात लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरू आहे. या निवडणुकीआधी (Karnataka Politics) कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी (CM Siddaramaiah) खळबळजनक दावा केला आहे. भारतीय जनता पक्ष राज्यात पुन्हा ऑपरेशन लोटस सक्रिय करण्याच्या प्रयत्नात आहे. भाजपने काँग्रेस आमदारांना 50 कोटी रुपयांची ऑफर दिली आहे, असा गंभीर आरोप सिद्धरामय्या यांनी केला आहे. भाजप असा आरोप करत आहे की जर कर्नाटकात लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला तर त्यांच्या नेतृत्वातील सरकारही कोसळेल या प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी हा आरोप केला.

या प्रश्नाला उत्तर देताना सिद्धरामय्या म्हणाले, मागील एक वर्षापासून ते आमचे सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. आमच्या आमदारांना 50 कोटी रुपयांची ऑफरही दिली गेली होती. त्यांनी प्रयत्न केले परंतु यात तो यशस्वी होऊ शकले नाही. काँग्रेसमधील एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की हे शक्य नाही. आमचे आमदार आम्हाला सोडून कुठेही जाणार नाहीत. सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वातील राज्य सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करील असा विश्वास आम्हाला आहे.

Karnataka Politics : कर्नाटकात सावरकर vs नेहरू! सावकरांचा फोटो हटणार ? नेमकं काय घडलं?

सिद्धरामय्या यांच्या आरोपांना उत्तर देताना भाजप खासदार एस. प्रकाश म्हणाले समाजातील एका वर्गाची सहानुभूती मिळवण्यासाठी ते वारंवार असे आरोप करत आहेत. हे अत्यंत दुर्दैवी आहे. कर्नाटकातील काँग्रेस सरकार त्यांचे काम आणि त्यांनी आतापर्यंत काय केले यावर लक्ष देण्याऐवजी खोटे आरोप करत आहे. लोकसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी या निवडणुकीनंतर पक्षातील आपली जागा अधिक पक्की करण्याचे काम सिद्धरामय्या सध्या करत आहेत अशी टीका आमदार एस. प्रकाश म्हणाले.

दरम्यान, कर्नाटकात लोकसभेच्या 28 जागा आहेत. मागील निवडणुकीत भाजपने यापैकी 25 जागा जिंकल्या होत्या. आताही भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. राज्यात भाजपाची ताकद जास्त आहे. परंतु, राज्यात काँग्रेसचं सरकार आहे. त्यामुळे भाजपाला परिस्थिती आव्हानात्मक बनली आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या वक्तव्याने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यांच्या या आरोपावर भाजप नेतेही जोरदार प्रत्युत्तर देत आहेत. त्यामुळे निवडणुकीआधीच कर्नाटातील राजकारणात पुन्हा ऑपरेशन लोटसने एन्ट्री घेतली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी याआधीही भाजपवर ऑपरेशन लोटसचे आरोप केले होते.

PM मोदींचा मास्टरस्ट्रोक! भाजपने साधले महाराष्ट्र, UP अन् कर्नाटकमधील लोकसभेच्या 100 जागांचे गणित

follow us

वेब स्टोरीज