राहुल गांधींच्या शिक्षेविरोधात याचिका; न्यायालयाने याचिकाकर्त्यालाच फटकारले, म्हणाले तुम्ही..

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची सदस्यता रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. तसेच न्यायालयाने याचिकाकर्त्यालाही चांगलेच फटकारले आहे. न्यायालयाने तर याचिकेची सुनावणी करण्यासही नकार दिला. केरळ येथील रहिवासी आभा मुरलीधरन यांनी राहुल गांधी यांच्या प्रकरणाचा हवाला देत याचिका दाखल केली होती. त्यांनी जनप्रतिनिधीत्व […]

Rahul Gandhi 1

Rahul Gandhi 1

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची सदस्यता रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. तसेच न्यायालयाने याचिकाकर्त्यालाही चांगलेच फटकारले आहे. न्यायालयाने तर याचिकेची सुनावणी करण्यासही नकार दिला.

केरळ येथील रहिवासी आभा मुरलीधरन यांनी राहुल गांधी यांच्या प्रकरणाचा हवाला देत याचिका दाखल केली होती. त्यांनी जनप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 8 (3) च्या संवैधानिक वैधतेला आव्हान दिले होते. यावर कोर्टाने कठोर भूमिका घेतली. न्यायालयाने याचिकाकर्त्यालाच विचारले, की तुम्ही कोण आहात ? तुमची सदस्यता रद्द झाली आहे का ?

निवृत्तीच्या निर्णयावर पवार म्हणाले… येत्या 2 दिवसात अंतिम निर्णय घेऊ

काय आहे प्रकरण ?

राहुल गांधी यांनी सन 2019 मध्ये लोकसभा निवडणुकांवेळी कर्नाटकातील कोलार येथे मोदी आडनावाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर राहुल गांधी यांच्याविरुद्ध केस दाखल करण्यात आली होती. सूरत न्यायालयाने राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे त्यांची खासदारकी देखील रद्द करण्यात आली आहे.

राहुल गांधी यांनी या निर्णयाला गुजरात उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यांनी शिक्षा स्थगित करण्याची मागणी केली आहे. न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी घेऊन निकाल राखून ठेवला आहे.

भाजप काहीही करु शकतो पण… राहुल गांधींचा भाजपवर निशाणा

पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात अब्रु नुकसानीचा खटला दाखल केला होता. सूरत न्यायालयाने 23 मार्च रोजी राहुल गांधींना शिक्षा सुनावली होती. न्यायालयाने त्यांनी दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. कोलार येथील एका रॅलीत राहुल गांधींनी सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे असू शकते, असे वक्तव्य केले होते.

Exit mobile version