Download App

Tamil Nadu : मुख्यमंत्र्यांची घोषणा..महिला कुटुंबप्रमुखांना मिळणार एक हजार

Tamil Nadu : दक्षिणेकडील राज्यात निवडणूक काळात मोठी आश्वासने दिली जातात. यामध्ये तामिळनाडू (Tamil Nadu) हे राज्य कायमच आघाडीवर असते. आताही राज्याचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन (M. K. Stalin) यांनी निवडणूक प्रचारादरम्यान एक घोषणा केली आहे. इरोड (पूर्व) या मतदारसंघातील उमेदवार ईवीके एस. एलंगोवन यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत स्टालिन यांनी राज्याच्या बजेटमध्ये राज्यातील महिला कुटुंबप्रमुखांना एक हजार रुपये दरमहा आर्थिक मदत देणार असल्याची घोषणा केली.

प्रचारादरम्यान ते म्हणाले, की सन 2021 मध्ये द्रमुक सरकार ज्यावेळी सत्तेत आले त्यावेळी राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत खराब होती. मात्र तरीसुद्धा पार्टीने जे आश्वासने लोकांना दिले होते ते पूर्ण करण्यात हात आखडता घेतला नाही.

हे वाचा : TamilNadu : तामिळनाडूमध्येही राज्यपाल विरुद्ध सरकार वाद पेटणार, राज्यपालांची सरकारवर टीका 

विरोधकांवर टीका करताना स्टालिन म्हणाले, की कुटुंबातील प्रत्येक महिला कुटुंबप्रमुखाला प्रति महिना एक हजार रुपये देण्यात येतील. डीएमकेद्वारे (DMK) दिली गेलेली प्रत्येक आश्वासने या वर्षाच्या अखेरपर्यंत पूर्ण करणार आहोत.

अण्णा द्रमुक (AIADMK) नेते एडप्पादी के. पलनीस्वामी यांच्या आरोपांना उत्तर देताना ते म्हणाले, की आतापर्यंत जवळपास 85 टक्के आश्वासने पूर्ण केली आहेत. याआधी अण्णा द्रमुक पक्षाच्या नेत्यांनी सांगितले होते, की निवडणूक काळात दिलेली कोणतीच आश्वासने द्रमुक सराकरने पूर्ण केली नाहीत. याला उत्तर देताना मुख्यमंत्री स्टालिन म्हणाले,की 85 टक्के निवडणूक आश्वासने पूर्ण करण्यात आली आहेत.

आदित्य ठाकरेंनी घेतली तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांची भेट

दरम्यान, 4 जानेवारी रोजी हृदयविकाराच्या झटक्याने येथील विधायक ई. थिरूमहान एवरा यांचे निधन झाले होते. त्यामुळे या मतदारसंघात निवडणूक आयोगाने पोटनिवडणुका जाहीर केल्या आहेत. या  निवडणुकीत उमेदवारांकडून जोरदार प्रचार सध्या सुरू आहे.

Tags

follow us