Download App

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 11 जवान शहीद

Naxal attack in Chhattisgarh : छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात (Naxal attack)11 जवान शहीद झाले आहेत. दंतेवाडातील अरनपूरच्या जंगलात नक्षलवाद्यांनी जवानांवर हल्ला केल्याचे समोर आले आहे.

या हल्ल्याची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस बंदोबस्त परिसरात रवाना करण्यात आला आहे. या स्फोटात 10 जवान आणि एका ड्रायव्हरचा मृत्यू झाला आहे. 2018 नंतर सुरक्षा दलाचे जवान शहीद होण्याची ही सर्वात मोठी घटना असल्याची माहिती आहे.

दिल्लीत महानगरपालिकेवर आपचे पुन्हा वर्चस्व, महापौरपदी आपच्या शैली ओबेरॉय यांची बिनविरोध निवड

मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी या हल्ल्यावर शोक व्यक्त केला आहे. या नक्षलवाद्यांना सोडले जाणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

नक्षलवाद्यांनी आयईडीचा स्फोट केला आहे. मात्र, अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात काही नक्षलवादीही जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. हे प्रकरण अरणपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे.

मिळालेल्या माहितीनुसार गृहमंत्री अमित शाहांनी छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांशी फोनवर बोलून त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. राज्य सरकारला जे काही लागेल ते दिले जाईल, असे ते म्हणाले.

DRG म्हणजे जिल्हा राखीव रक्षक, जे छत्तीसगड पोलिसांचे विशेष कर्मचारी आहेत. नक्षलवाद्यांशी लढण्यासाठीच त्यांची भरती करण्यात आली आहे. आत्मसमर्पण करणारे नक्षलवादी आणि बस्तरच्या वातावरणात वाढलेल्या लोकांचा यात समावेश आहे.

Tags

follow us