दिल्लीत महानगरपालिकेवर आपचे पुन्हा वर्चस्व, महापौरपदी आपच्या शैली ओबेरॉय यांची बिनविरोध निवड

दिल्लीत महानगरपालिकेवर आपचे पुन्हा वर्चस्व, महापौरपदी आपच्या शैली ओबेरॉय यांची बिनविरोध निवड

AAP’s Shaili Oberoi elected unopposed as Mayor of Delhi : दिल्लीच्या महापौरपदी पुन्हा एकदा आम आदमी (AAP) पक्षाच्या डॉ. शैली ओबेरॉय (Dr. Shaili Oberoi) विराजमान झाल्या आहेत. तर उपमहापौर म्हणून मोहम्मद इकबाल यांची निवड झाली आहे. मतदान प्रक्रियेच्या काही मिनिटे आधीच भाजपने (BJP) या निवडणूकतीतुन माघार घेतली. त्यामुळे आपचे उमेदवार यावेळी बिनविरोध निवडून आले. स्थायी समिती गठीत करण्यासाठी आपने मनाई केली असून यामुळं लोकांचे प्रश्न प्रलंबित राहत असल्याचे कारण देत भाजपने निवडणुकीतून माघार घेतली.

गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान दिल्ली महापालिकेच्या निवडणुका देखील झाल्या होत्या. त्या निवडणुकीत आपनं भाजपला धुळ चारत पराभूत केलं होतं. त्यानंतर दिल्लीत 22 फ्रेब्रुवारी रोजी महापौर पदाच्या निवडणुका झाल्या होत्या. त्याचवेळी शैली ओबेरॉय मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या होत्या. मात्र, त्यांचा कार्यकाळ 31 मार्च रोजी संपुष्टात आला. दिल्ली महानगरपालिकेच्या अधिनियमानुसार, नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे, एप्रिल महिन्यात नवा महापौर निवडला जातो त्यानुसार, दिल्लीत पुन्हा महापौर पदाच्या निवडणुका लागल्या होत्या. या निवडणुकीत भाजपा आणि आपने दोघांनीही उमेदवार जाहीर केले. आपकडून शैली ओबेरॉय यांना नामांकन मिळालं, तर भाजपकडून शिखा राय यांना उमेदवारी मिळाली. तसंच उपमहापौर पदासाठी मोहम्मद इक्बाल आणि भाजपकडून सोनी पांडेय यांना उमेदवारी देण्यात आली होती.

दरम्यान, या निडवणुकीची मतदान प्रक्रिया सुरू होण्यााआधीच भाजपाने या निवडणूकीतून माघार घेतली आणि आपचे डॉ. शैली ओबेरॉय यांची महापौर पदी निवड झाली. तर मोहम्मद इक्बाल यांची उपमहापौर पदी बिनविरोध निवड झाली आहे.

यानंतर विजयानंतर शैली ओबेरॉय यांनी आपण दिल्ली महापालिकेचं कामकाज हे संविधानिक रितीनं करणार असल्याचं सांगत सभागृहाची प्रतिष्ठा कायम ठेवण्यात सर्वांनी सहकार्य करावं, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Dahaad Teaser Release: कल्पनेपलिकडच्या वास्तवाची गोष्ट, ‘दहाड’चा थरारक टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

कोण आहेत शैली ओबेरॉय
शैली ओबेरॉय या प्राध्यापिक आहेत. त्या सध्या दिल्ली विद्यापीठात व्हिजिंटिंग प्रोफेसर आहेत. त्यांनी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवली, तर विद्यापीठाच्या स्कुल ऑफ मेनेजमेंट स्टडीजमधून पीएचडी पूर्ण केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube