Naxalites Attack chhattisgarh : नक्षलवाद्यांनी केलेल्या अत्याधुनिक स्फोटकांच्या स्फोटात आज विशेष कृती दलाचे दोन जवान हुतात्मा झाले, तर इतर चार जण जखमी झाले. (Soldiers killed) छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यातील तारेम भागात ही घटना घडली. (Naxalites) या घटनेनंतर मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करताना जवानांचं हौतात्म्य व्यर्थ जाऊ देणार नाही, असं आश्वासन दिलं आहे.
माणसाच्या महत्त्वाकांक्षा कधीच संपत नाहीत; भगवानही बनू पाहतो, मोहन भागवतांचा रोख कुणाकडं?
महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर बुधवारीच गडचिरोली पोलिसांनी मोठी कारवाई करत बारा नक्षलवाद्यांना ठार केलं. या यशाचं कौतुक होत असतानाच छत्तीसगडमध्ये मध्यरात्रीच नक्षलवाद्यांनी जवानांच्या पथकावर हल्ला केला. बिजापूर-सुकमा-दंतेवाडा या जिल्ह्यांच्या संयुक्त सीमेवरील जंगलात नक्षलवादविरोधी मोहीम पूर्ण करून विशेष कृती दल, जिल्हा राखीव दल, केंद्रीय राखीव पोलिस दल आणि कोब्रा पथक यांचं संयुक्त पथक परतत असताना दहशतवाद्यांनी रस्त्यात पेरून ठेवलेल्या बाँबचा स्फोट झाला. या स्फोटात भारत साहू आणि सत्येर सिंह कांगे हे दोघं हुतात्मा झाले.
स्फोटाचा मोठा आवाज झाला अन् ; ट्रेन चालकाची आपबिती, पण गावकरी वेगळेच सांगतायत
या घटनेनंतर तातडीने या भागात जादा कुमक मागवत नक्षलवाद्यांविरोधात शोधमोहिम सुरू करण्यात आली आहे. जखमी जवानांना रायपूर येथे उपचारासाठी हलवण्यात आलं आहे. दरम्यान, नक्षलवाद्यांविरोधात जोरदार मोहिमा सुरू असल्याने त्यांना नैराश्य आलं असून त्यातूनच असे हल्ले होत आहेत. मात्र, आमची लढाई सुरूच राहणार असून जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही असं मुख्यमंत्री विष्णुदेव साय म्हणाले आहेत.