Download App

अजितदादांचे धक्कातंत्र सुरुच; दिल्लीत जाताच पवारांचा मोहरा फोडला

Sharad Pawar Vs Ajit Pawar :  उपमुख्यमंत्री अजित पवार आज दिल्ली येथे राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएच्या बैठकीसाठी दाखल झाले आहे. दिल्ली येथे ही बैठक होत असून भाजपचे नेते विनोद तावडे यांनी त्यांचे स्वागत केले आहे. दिल्लीमध्ये जाताच अजित पवारांनी शरद पवारांचा आणखी एक मोहरा फोडला आहे. शरद पवार एकीकडे विरोधकांच्या बैठकीसाठी बंगळुरुला रवाना झाले असताना दिल्लीमध्ये अजित पवारांनी राष्ट्रवादीचा आणखी एक बडा नेता गळाला लावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते व राष्ट्रीय सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी दिल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन आपला पाठिंबा व्यक्त केला आहे. त्यामुळे अजित पवारांच्या गोटात राष्ट्रीय पातळीवरील आणखी एक मोठा नेता सहभागी झाला आहे.

Opposition Meeting : मोदींच्या विरोधातील पैलवान कोण? मुंबईत होणार शिक्कामोर्तब

यामुळे शरद पवारांच्या गटाला आणखी एक धक्का बसला आहे. दिल्ली येथे राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएची बैठक बोलविण्यात आली आहे. या बैठकीसाठी अजित पवार व प्रफुल्ल पटेल हे दाखल झाले आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर अजित पवार आज पहिल्यांदा एनडीएच्या बैठकीसाठी दिल्लीला गेले आहे. दिल्लीत येताच अजित पवारांनी शरद पवारांना आणखी एक धक्का दिला आहे.  अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आज पहिल्यांदाच ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीदेखील भेट घेणार आहे.

किरीट सोमय्यांचा पाय आणखी खोलात? “लाव रे तो व्हिडीओ…” म्हणत पेनड्राईव्ह विधिमंडळात

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट झाल्यानंतर दोन्ही बाजूने आपल्याकडे नेते कसे येतील याचे प्रयत्न सुरु आहेत. राज्यामध्ये जवळपास सर्वाधिक आमदारांनी अजितदादांना आपला पाठिंबा दिला आहे. अजितदादांकडून 40 आमदारांच्या सह्यांचे पत्र निवडणूक आयोगाला देण्यात आले आहे. त्या पत्रात अजित पवारांना आम्ही राष्ट्रवादीचे अध्यक्ष केल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

Tags

follow us