Download App

मोठी बातमी : NEET PG प्रवेश परीक्षेच्या नवीन तारखा जाहीर, वाचा सविस्तर टाईम टेबल

नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस (NBEMS) ने NEET PG परीक्षेची नवीन तारीख जाहीर केली आहे.

  • Written By: Last Updated:

नवी दिल्ली : एकीकडे नीट परीक्षांवरून (NEET Exam) गोंधळ सुरू असतानाच आता परीक्षांच्या नव्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार ही परीक्षा 11 ऑगस्ट 2024 रोजी दोन शिफ्टमध्ये होणार आहे. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेसने (National Board of Examinations in Medical Sciences) जारी केलेल्या नोटीसमध्ये आता NEET PG परीक्षा 11 ऑगस्ट रोजी घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

लाडकी बहिण योजना म्हणजे दमडीचा सौदा अन् हेलपाटे चौदा; दानवेंची सरकारवर जोरदार टीका 

NEET PG 2024 चे आयोजन 23 जून रोजी होणार होते. परंतु पेपर फुटीच्या प्रकरणानंतर ही परीक्षा रद्द करण्यात आली होती. त्यानंतर आज (दि.5) नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेसने परीक्षेची नवी तारीख जाहीर केली आहे. त्यानुसार 11 ऑगस्ट रोजी दोन सत्रात ही परीक्षा होणार आहे. 11 ऑगस्ट रोजी देशभरातील विविध केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. ही परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेतली जाणार असून, कट ऑफ डेट 15 ऑगस्ट हीच राहील असेही सांगण्यात आले आहे.. आता ही परीक्षा नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस (NBEMS) द्वारे घेतली जाईल.

बोलणी फिस्कटली, निवडणूक लागली… : 12 जुलैला विधानपरिषदेचे धूमशान 

NEET PG प्रवेशपत्र कधी येणार?
परीक्षेच्या नवीन तारीख जाहीर केल्यानंतर NBE आता NEET PG 2024 या परीक्षेचे प्रवेशपत्र देखील पुन्हा जारी करणार आहे. NEET PG परीक्षेचे प्रवेशपत्र परीक्षेच्या एक आठवड्या आधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होतील. या परीक्षेचे प्रवेशपत्र विद्यार्थी nbe.edu.in या वेबसाईटवर जाऊन डाउनलोड करू शकतात.

NEET PG 2024 ची परीक्षा यापूर्वी 23 जून रोजी होणार होती. परंतु UGC NET आणि NEET UG सारख्या इतर काही परीक्षांमधील कथित अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर, आरोग्य मंत्रालयाने खबरदारीचा उपाय म्हणून जूनमध्ये NEET PG परीक्षा पुढे ढकलली होती. त्यानंतर विद्यार्थी गेल्या काही दिवसांपासून या परीक्षेच्या नव्या तारखेची वटा पाहत होते. दरम्यान, आज नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे.

follow us