तपासासाठी पोलिसांचं पथक परराज्यात; नीट पेपर लीक प्रकरणातला म्होरक्या मराठवाड्यातलाच

तपासासाठी पोलिसांचं पथक परराज्यात; नीट पेपर लीक प्रकरणातला म्होरक्या मराठवाड्यातलाच

NEET Exam Scam : देशभरात ज्या प्रकरणाने एक वादळ निर्माण केलय ते प्रकरण म्हणजे वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या ‘नीट’ परीक्षा पेपरफुटीचं प्रकरण. (NEET Exam) या प्रकरणाचे दुसरे कुठं नाही तर मराठवाड्यातील लातूरपर्यंत त्याचे धागेदोरे पोहचले आहेत. यामध्ये पोलिसांनी दोघांना अटकही केली. त्यांच्या चौकशीत काही बाबी समोर येतायंत. (NEET) दरम्यान, यातील मुख्य म्होरक्याचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांचं एक पथक दिल्ली, डेहराडूनला गेलं होतं. तिकडे गंगाधर गुंडे याला ताब्यात घेण्यात आलं. (Scam) हा मराठवाड्यातील असून तो दिल्लीत राहतो. या प्रकरणात तो सर्व काही हालचाली करत असल्याचं समोर आलं आहे.

लालकृष्ण अडवाणी यांची अचानक प्रकृती खालावली; दिल्लीतील एम्स रुग्णालयात केलं दाखल

मोठी आर्थिक उलाढाल

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या संशयितांच्या सांगण्यावरुन पोलिसांनी काही पालक, विद्यार्थ्यांनाकडं चौकशी केली आहे. दरम्यान, या प्रकारणात मोठी आर्थिक उलाढाल असल्याचा संशय आहे. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणात पोलिसांनी मूळ येथील रहिवासी व सोलापूर जिल्हा परिषदे शाळेचा शिक्षक संजय जाधव व लातूर जिल्हा परिषदे शाळेचा मुख्याध्यापक जलील पठाण यांना या प्रकरणात अटक केली आहे. या दोघांनाही दोन जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणातील म्होरक्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचं पथक दिल्ली तसेच डेहराडूनला गेलेलं आहे त्यामध्ये एकजणाचा शोध लागला आहे.

पालक व विद्यार्थ्यांना अटक

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांचं एक पथक बीड जिल्ह्यात गेलं होते. या जिल्ह्यातील काही पालक व विद्यार्थ्यांना अटक करण्यात आलेल्या संशयितांसोबत व्यवहार केल्याचा संशय पोलिसाना आहे. यातून दहा पालक व विद्यार्थ्यांची पोलिसांनी चौकशी केली आहे. त्यांचे जवाबही नोंदवण्यात आले आहेत. यातील बहुतांश पालक हे शिक्षक असल्याचं समोर आलं आहे.

प्रकरणात बहुतांश शिक्षक भारत जोडोनंतर आता आषाढी वारी? राहुल गांधी करणार विठू नामाचा गजर

‘एटीएस’ने या प्रकरणात पहिल्यांदा दोघांना अटक केली होती. तसंच या प्रकरणातील आणखी एक इराण्णा कोनगलवार हा अन्य एक संशयित लातूरचाच आहे. तो उमरगा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कार्यरत आहेत. त्याला ‘एटीएसकडून पहिल्यांदा ताब्यात घेण्यात आलं होते. त्याच्याकडून मोबाईलही जप्त करण्यात आला होता. पण नंतर त्याला सोडून दिलं गेलं. आता त्याचाही स्थानिक पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणात अटक केलेल्या दोघांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. मिळणाऱ्या माहितीचा आधार घेत पोलीस तपास करत आहेत. तसंच या दोघांनी कोट्यवधीची संपत्ती जमवल्याचा संशय असून ती कुठं-कुठं ठेवली आहे, याची माहितीही पोलीस यंत्रणा घेत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube