लालकृष्ण अडवाणी यांची अचानक प्रकृती खालावली; दिल्लीतील एम्स रुग्णालयात केलं दाखल
Lal Krishna Advani Admitted : माजी उपपंतप्रधान आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती अचानाक खालावल्यानं त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. (Lal Krishna Advani ) त्यांना रात्री प्रकृतीच्या काही समस्या जाणवायला लागल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अडवाणी यांना एम्सच्या जेरियाट्रिक विभागाच्या डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. (AIIMS ) खबरदारीचा उपाय म्हणून थोडा त्रास जाणवायला लागला की लगेच अडवाणी यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं आहे.
वय जास्त झाल्याने समस्या
लालकृष्ण अडवाणी यांच्या प्रकृतीबाबत अद्याप अधिकची काही माहिती समोर आलेली नाही. वय जास्त झाल्याने अडवाणी यांची प्रकृती खालावली अशी माहिती समोर आलेली आहे. अडवाणी यांचं मेडिकल बुलेटिन एम्सचे डॉक्टर आणि वैद्यकीय तज्ज्ञ लवकरच जारी करू शकतात.अडवाणी यांना भारत सरकारनं देशातील सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजेच, भारतरत्न प्रदान केला आहे.
घरी जाऊ सन्मान भाजपचा आणखी एक मित्रपक्ष फुटीच्या उंबरठ्यावर; ऑपरेशन लोटस झाल्याचा आरोप
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लालकृष्ण अडवाणी यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन भारतरत्न देऊन सन्मानित केलं आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि माजी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू उपस्थित होते. अडवाणी यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना त्यांच्या निवासस्थानीच भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात आलं होतं.
कराची येथे जन्म Video : ओम बिर्लांना शुभेच्छा देताना तटकरेंनी गाजवली लोकसभा; शाहंसह राजनाथही ऐकत राहिले
लालकृष्ण अडवाणी यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1927 रोजी सध्याच्या पाकिस्तानातील कराची येथे झाला आहे. मी 12 सप्टेंबर 1947 रोजी पाकिस्तान सोडल्याचं त्यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं. त्यांच्यानंतर एक महिन्यानं त्यांचं कुटुंब भारतात आलं. लालकृष्ण अडवाणी यांच्या कुटुंबात त्यांच्या कन्या प्रतिभा अडवाणी आणि त्यांचे चिरंजीव जयंत अडवाणी आहेत. अडवाणींचा मुलगा आणि मुलगी दोघेही राजकारणापासून दूर आहेत.
Veteran BJP leader LK Advani admitted to AIIMS
Read @ANI Story | https://t.co/oJ9N9E6T64#LKAdvani #AIIMS #BJP pic.twitter.com/EoqYgKKG7T
— ANI Digital (@ani_digital) June 27, 2024