भाजपचा आणखी एक मित्रपक्ष फुटीच्या उंबरठ्यावर; ऑपरेशन लोटस झाल्याचा आरोप

भाजपचा आणखी एक मित्रपक्ष फुटीच्या उंबरठ्यावर; ऑपरेशन लोटस झाल्याचा आरोप

Old allies Shiromani Akali dal blame BJP for broke Party : लोकसभा निवडणुकीनंतर भाजपने (BJP) मित्र पक्षांसह (allies) एनडीएचे सरकार स्थापन केलं आहे. त्यानंतर भाजपचं ऑपरेशन लोटस पुन्हा एकदा सक्रिय झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यावेळी हा दावा विरोधी पक्षाने नाही तर एकेकाळी भाजपचा मित्र पक्ष राहिलेल्या पंजाबमधील शिरोमणी अकाली दलच्या (Shiromani Akali dal) नेत्यांनी केला आहे.

‘गद्दारीचा ठसा पुसण्यासाठीच CM शिंदेंनी जरांगेला पुढं आणलं’; नवनाथ वाघमारेंचा गंभीर आरोप

शिरोमणी अकाली दलचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष परमजीत सिंह सरना यांनी भाजपवर गंभीर आरोप करत म्हटलं आहे की, भाजप ऑपरेशन लोटसच्या माध्यमातून प्रादेशिक पक्षांना कमजोर करण्याचा प्रयत्न करत आहे. हे मी लेखी देत आहे. त्यामुळे भाजपने माझ्यावर जी काय कारवाई करायची ती करावी. त्यांना हा आरोप खोटा वाटत असेल तर त्यांनी माझ्यासोबत चर्चेला यावं. मात्र भाजपाचा हा प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. असेही ते यावेळी म्हणाले.

सगेसोयरे अध्यादेश रद्द करावा, मराठ्यांना कुणबी दाखले देणे तात्काळ थांबवा…; वंचितचा ठराव

दरम्यान बंडखोर नेते परमिंदर सिंग दिंडसा आणि बीबी जागीर कौर यांच्या बंडखोरीनंतर मंगळवारी शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल यांच्या विरोधात पक्षातील काही नेत्यांनी प्रस्ताव पारित करत लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी राजीनामा द्यायला हवा. अशी मागणी केली. बादल यांना मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान यावर बादल यांच्या पत्नी आणि खासदार हरसिमरत कौर यांनी पक्षांमध्ये कोणतीही फूट नसून भाजप पक्ष फोडण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रात त्यांनी जसं केलं तसंच ते पंजाब मध्ये करू इच्छित आहेत. मात्र त्यांच्या प्रयत्न यशस्वी होणार नाही. त्यामुळे आता महाराष्ट्रात ज्याप्रमाणे शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या पक्षांचे दोन गट निर्माण झाले आहेत. तशीच परिस्थिती पंजाबमध्ये होण्याची शक्यता आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज