NDA सरकारचं शेतकऱ्यांना गिफ्ट; भात, कापसासह 14 पिकांच्या एमएसपी दरात मोठी वाढ

NDA सरकारचं शेतकऱ्यांना गिफ्ट; भात, कापसासह 14 पिकांच्या एमएसपी दरात मोठी वाढ

Crop MSP Rate Increase in Modi Cabinet Meeting : लोकसभा निवडणुकीनंतर देशात आता एनडीएचं सरकार (NDA Government) आहे. या सरकारने कामाला सुरुवात केली असून पहिलंच गिफ्ट शेतकरी वर्गाला दिलं आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या (Modi Cabinet) अध्यक्षतेत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत भात, कापूस यांसह अन्य 12 पिकांच्या एमएसपी (किमान आधारभूत किंमत) दरात वाढ करण्यात आली आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सरकारच्या या निर्णयाची माहिती दिली.

या निर्णयाच्या माध्यमातून एमएसपीच्या रुपात शेतकऱ्यांना जवळपास दोन लाख करोड रुपये (MSP Rate Increase in Kharif Crops) मिळणार आहेत. मागील हंगामातील 35 हजार कोटींच्या तुलनेत ही रक्कम कितीतरी जास्त आहे असे वैष्णव म्हणाले. या निर्णयानुसार कापसाचा नवीन एमएसपी 7121 रुपये आणि दुसऱ्या जातीसाठी 7521 रुपये मंजूर करण्यात आला आहे. मागील एमएसपीच्याा तुलनेत 501 रुपये जास्त आहे.

PM Modi Cabinet : मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील नितीन गडकरी, पियूष गोयलसह ‘या’ खासदारांनी घेतली शपथ

सरकारने धानासाठी 2300 रुपये प्रति क्विंटल एमएसपी निश्चित केली आहे. मागील वर्षापेक्षा यामध्ये 117 रुपयांची वाढ केली आहे. तूरडाळीसाठी 7550 रुपये प्रति क्विंटल एमएसपी निश्चित केली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यामध्ये 550 रुपये वाढ झाली आहे. उडीद डाळीची एमएसपी 7400 रुपये प्रति क्विंटल निश्चित करण्यात आली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यामध्ये 450 रुपये वाढ झाली आहे. मुगासाठी 8682 रुपये प्रति क्विंटल एमएसपी निश्चित करण्यात आली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यामध्येही 124 रुपये वाढ झाली आहे.

भुईमूगासाठी 6783 रुपये प्रति क्विंटल एमएसपी निश्चित करण्यात आली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत या दरात 406 रुपये वाढ झाली आहे. तीळाच्या एमएसपी दरातही 632 रुपये वाढ करण्यात आली आहे. कालच्या बैठकीत सरकारने या महत्वाच्या निर्णयासह अन्य महत्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये वाराणसीतील लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विकास आणि विस्ताराला मंजुरी देण्यात आली.

PM Modi यांच्या शपथविधीला पोहचले अन् खासदारही नसलेल्या या नेत्याला लागली थेट मंत्रिपदाची लॉटरी

असे आहेत नवीन एमएसपी दर (प्रति क्विंटलमध्ये)

ज्वारी – 3371 रुपये
नाचणी – 2490 रुपये
बाजरी – 2625 रुपये
मका – 2225 रुपये
मूग – 8682 रुपये
तूर – 7550 रुपये
उडीद – 7400 रुपये
तीळ – 9267 रुपये
भुईमूग – 6783 रुपये
रेप सीड – 8717 रुपये
सूर्यफुल – 7280 रुपये
सोयाबीन – 4892 रुपये
कापूस – 7121 रुपये
भात – 2300 रुपये

follow us
  • fb
  • instagram
  • youtube