मोठी बातमी! लालकृष्ण अडवाणी यांची तब्येत पुन्हा बिघडली, अपोलो रुग्णालयात दाखल

मोठी बातमी! लालकृष्ण अडवाणी यांची तब्येत पुन्हा बिघडली, अपोलो रुग्णालयात दाखल

LK Advani : देशाचे माजी उपपंतप्रधान आणि भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी (LK Advani) यांची पुन्हा एकदा तब्येत बिघडली असल्याची माहिती समोर आली आहे. पुन्हा तब्येत बिघडल्याने त्यांना दिल्लीतील अपोलो रुग्णालयात (Apollo Hospital) दाखल करण्यात आले आहे.

माहितीनुसार, त्यांची प्रकृती स्थिर आहे. 96 वर्षीय लालकृष्ण अडवाणी सध्या डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली आहेत. गेल्या महिन्यात देखील अडवाणी यांना अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

माहितीनुसार, अडवाणी यांना वृद्धापकाळाशी संबंधित आजारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. यूरोलॉजी, कार्डिओलॉजी आणि जेरियाट्रिक मेडिसिनसह विविध तज्ञांकडून त्यांची तपासणी करण्यात येत आहे. अशी माहिती सध्या समोर आली आहे.

तसेच जुलैच्या पहिल्या आठवड्यात अडवाणींना या रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि दोन दिवस वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आले होते. त्यावेळी न्यूरोलॉजी विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. विनीत सुरी यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते.

“महाराष्ट्रात ‘सुपारीबाज’ कोण हे रोहित पवारांनी..” मनसे नेत्याचं रोखठोक प्रत्युत्तर

तर त्यापूर्वी अडवाणी यांना ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) मध्ये दाखल करण्यात आले होते आणि तेथे रात्रभर ठेवल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले होते.

भारतीय राजकारणातील प्रमुख व्यक्तींपैकी एक व्यक्ती म्हणून लालकृष्ण अडवाणी यांची ओळख आहे. अडवाणी भारतीय जनता पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहे. त्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहे. त्यामुळे भारत सरकारकडून त्यांना देशातील सर्वोच्च सन्मान भारतरत्न देखील देण्यात आले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube