“महाराष्ट्रात ‘सुपारीबाज’ कोण हे रोहित पवारांनी..” मनसे नेत्याचं रोखठोक प्रत्युत्तर
MNS Leader Prakash Mahajan replies Rohit Pawar : आगामी विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली आहे. या दौऱ्यावर राज्यातील अन्य पक्षांच्या नेत्यांचे बारकाईने लक्ष असल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी या दौऱ्यावर खोचक टीका केली होती. सरकारकडून लाडकी सुपारी योजना सुरू केली पण सुपारीबाजांचा करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय महाराष्ट्रातील जनता शांत बसणार नाही, अशी टीका आमदार रोहित पवार यांनी केली. रोहित पवार यांच्या या टीकेवर मनसे नेते प्रकाश महाजन यांनी (Prakash Mahajan) जशास तसे उत्तर दिले. रोहित पवार यांनी आरोप केला असेल मात्र महाराष्ट्रात कोण सुपारीबाज आहे? हे आपल्या घरातील वरिष्ठ माणसांना विचारा असे प्रत्युत्तर प्रकाश महाजन यांनी दिले.
Video : राज्यातील 50 लाख युवा खोटं बोलत आहेत का?; खडा सवाल विचारत रोहित पवार संतापले
काय म्हणाले रोहित पवार?
महाराष्ट्रातून गुजरातला गेलेले उद्योग, केंद्र सरकारची गुजरातवर असलेली मेहेरबानी, केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला मिळालेला भोपळा, महाराष्ट्राचे आर्थिक, सामाजिक खच्चीकरण करण्याचे होत असलेले प्रयत्न आणि त्यात लाडक्या खुर्चीच्या प्रेमापोटी गप्प बसलेले सरकार यामुळे महाराष्ट्रात प्रचंड रोष आहे. या रोषाचा फटका बसू नये म्हणून मतांचे विभाजन करण्यासाठी लोकप्रिय खेळाडू मैदानात उतरवून 288 जागा लढण्याचे आदेश सत्ताधाऱ्यांना दिल असल्याचे कळते.
खेळाडू लोकप्रिय असला तरी महाराष्ट्राला दुसऱ्याच्या इशाऱ्यावर नाचणारे, तडजोडी करणारे खेळाडू आवडत नाहीत. महाराष्ट्रात निवडणुका जवळ येत असल्याने दलालीतून गलेलठ्ठ झालेल्या सरकारने लाडकी सुपारी योजना सुरू केली असली तरी महाराष्ट्र प्रिय असलेले खेळाडू सत्ताधाऱ्यांच्या अडकित्त्यात अडकणार नाहीत ही अपेक्षा. लाडकी सुपारी योजनेच्या सर्व छोटा मोठ्या सुपारीबाज लाभार्थ्यांसकट या दलाली सरकारचा करेक्ट कार्यक्रम वाजवल्याशिवाय महाराष्ट्र शांत बसणार नाही, असे ट्विट रोहित पवार यांनी केले.
Raj Thackeray : मनसेमध्ये ठाकरेंचं ‘राज’! पक्षाध्यक्ष म्हणून पुन्हा निवड
काय म्हणाले प्रकाश महाजन?
महाराष्ट्रात कोण सुपारीबाज आहे हे आपल्याच घरातील वरिष्ठ माणसांना विचारा. रोहित पवार यांचा असा कोणता व्यवसाय आहे ज्यामधून त्यांनी कन्नड सहकारी साखर कारखाना घेतला हे रोहित पवारांनी मला सांगावं. सुप्रिया सुळे यांनी (Supriya Sule) देखील मला सांगावं की यांच्या शेतात 110 कोटी रुपयांची वांगी कशी आली? मी अनेकदा बारामतीला जातो आणि मित्रांना विचारतो की या 110 कोटी रुपयांच्या वांग्याचं भरीत खायला मिळेल का, पण मला अजूनही या वांग्याचं भरीत खायला मिळालं नाही अशी खोचक टीका मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केली.