NEET Re-Exam Big Update : पेपर फुटीच्या प्रकारणानंतर आता नीट-यूजी पुनर्परीक्षा 21 जून रोजी पार पडणार आहे. यावेळच्या परीक्षेत कोणत्याही प्रकारचा गोंधल होऊ नये यासाठी केंद्र सरकारने पूर्ण ताकद पणाला लावली आहे. परीक्षा पूर्णपणे सुरक्षित आणि पेपरफुटी-मुक्त व्हावी यासाठी विविध स्तरांवर उपाययोजना केल्या जात असून, परीक्षेच्या पार्श्वभूमीवर पाच लाख जवान, AI कॅमेरांसह निमलष्करी दलांच्या माध्यमातून निगराणी ठेवली जाणार आहे.
नीट पुनर्परीक्षेसाठी कडक व्यवस्था
नीट पुनर्परीक्षेसाठी कडक व्यवस्था करण्यात आली आहे. ही परीक्षा 21 जून रोजी होणार असून, या दिवशी देशभरातील नीट परीक्षा केंद्रांवर 5 लाखांहून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात केले जाणार आहेत. याशिवाय कोणताही गैरप्रकार किंवा फेरफार होऊ नये, यासाठी बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्थाही करण्यात आली आहे.
NEET Paper Leak : नीट पेपर लीक अन् तीन मनीषा एकाच नावाच्या गँगची इनसाईड स्टोरी
21 जून रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर दोन लाखांहून अधिक पोलीस, होमगार्ड, जिल्हा प्रशासकीय कर्मचारी आणि परीक्षक तैनात केले जाणार आहे. याशिवाय, परीक्षेसंबंधित संवेदनशील ठिकाणांची सुरक्षा करण्यासाठी निमलष्करी दले तैनात करण्यात येणार आहे. तसेच देशभरातील परीक्षा केंद्रांवर एक लाखांहून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे निगराणी ठेवली जाईल. बहुस्तरीय निगराणी आणि एआय-आधारित देखरेख प्रणाली लागू केली जाणार आहे.
गेटवरच होणार आधार पडताळणी
21 जून रोजी नीट परीक्षा केंद्रावर येणाऱ्या उमेदवारांची प्रवेशद्वारावर आधार पडताळणी केली जाणार आहे, त्यामुळे बनावट परीक्षा देण्याची शक्यता संपुष्टात येण्यास मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. या परीक्षेत राज्य सरकार, केंद्र सरकार, स्थानिक प्रशासन, पोलीस, केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालय आणि खाजगी शाळा सहभागी होणार असून, या परीक्षेला 23 लाख उमेदवार बसण्याची शक्यता आहे.
