NEET Scam : NEET-UG परीक्षा. डॉक्टरांना घडवणारी सगळ्यात पहिली परीक्षा. याच परीक्षेच्या आधारे एखाद्या विद्यार्थ्याला एमबीबीएसला प्रवेश मिळणार की नाही हे ठरवले जाते. तिथून त्याचे शिक्षण आणि मग करीअर सुरु होते. पण हीच चाळणी परीक्षा काही दिवसांपासून वादात सापडली आहे. आधी दीड हजार मुलांच्या प्रचंड वाढलेल्या मार्क्सवरुन मोठा वाद झाला. ते मार्क्स ग्रेस मार्क्स दिल्याने वाढल्याचे ही परीक्षा घेणाऱ्या एनटीएने (NTA) सांगितले. वाढता वाद पाहुन हे मार्क्स रद्द केले. आता हा वाद शांत होईल असे वाटत असतानाच पेपरफुटीचे प्रकरण समोर आले आहे. (NEET Scam : Question paper on mobile, answers from doctors… Munnabhai pattern of NEET paper)
GST Council Meeting: रेल्वेची सेवा जीएसटीबाहेर, पण दूधाचे कॅन, सोलर कूकर महागणार
बिहार पोलीस (Bihar Police) आणि आर्थिक गुन्हे शाखेला या प्रकरणात मोठे धागेदोरे हाती लागले आहेत. आतापर्यंत सिकंदर यादवांपासून अमित आनंदपर्यंत नाव या प्रकरणात समोर आली आहेत. हे दोघेही या पेपर लीक प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी आहेत. तब्बल 32 लाख रूपयांमध्ये त्यांनी हे पेपर फोडले असल्याचे सांगितले जात आहे. आता बिहार पोलीस या प्रकरणी संजीव कुमार उर्फ संजीव मुखिया उर्फ लुटन याचा शोध घेत आहेत. तो या संपूर्ण प्रकरणाचा सूत्रधार असल्याचे बोलले जाते. 2010 पासून अनेक परीक्षांचे पेपर लीक करण्यात संजीव मुखियाचा हात आहे.
पुढील 5 दिवस सावधान! कोकण, मराठवाड्यासह ‘या’ भागात धो धो पावसाला होणार सुरुवात
नेमका या सगळ्यांनी हा पेपर कसा फोडला त्याचीच एक इनसाईड स्टोरी समोर आली आहे. काय आहे ही स्टोरी… पाहुया सविस्तर.
पोलिसांच्या मते NEET पेपर कुठेही आधी पोहोचला तर तो संजीव मुखियापर्यंत पोहोचला. मुखिया हा नूरसराय हॉर्टिकल्चर कॉलेजचे कर्मचारी आहे. 4 मेच्या रात्री पाटण्याच्या खेमनीचकमधील लर्न प्ले स्कूल आणि बॉईज हॉस्टेलमध्ये हा सगळा प्रकार सुरु झाला. अगदी मुन्नाभाई स्टाईलप्रमाणे काही प्राध्यापकांनी NEET चा पेपर संजीव मुखियाला पाठवला होता. या हॉस्टेलमध्ये पाटणा आणि रांची येथील एमबीबीएसचे काही विद्यार्थी उपस्थित होते. या सगळ्यांनी पेपरमध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहिली.
इथून ज्या उमेदवारांकडून पैसे घेतले होते, त्यांना ही उत्तरे देण्यात आली. संपूर्ण सेटिंगसाठी संजीव मुखिया यांनी त्यांचे जवळचे मित्र प्रभात रंजन यांचे घर भाड्याने घेतले होते. प्रभात रंजन एक स्थानिक राजकारणी आहेत. ही उत्तरे उमेदवारांनी घोकंमपट्टी करून लक्षात ठेवायची होती. दुसऱ्या दिवशी उमेदवारांना त्यांच्या परीक्षा केंद्रांवर सोडण्यात आले. मात्र एवढे उपद्व्याप करुनही यातील दोन ते तीन जण सोडल्यास लर्न प्ले स्कूल आणि बॉईज हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या उमेदवारांना फारसे चांगले गुण मिळाले नाहीत.
ज्या विषयाची उत्तरे त्यांना लक्षात ठेवता आली त्या एकाच पेपरमध्ये त्यांचे गुण चांगले आहेत, पण इतर विषयात त्यांना काहीही करता आलेले नाही. या गुन्ह्यातील अभिषेक कुमार आणि शिवनंदन कुमार यांनाच केवळ चांगले गुण मिळायचे चित्र आहे. या दोघांनीही सर्व विषयांमध्ये चांगली कामगिरी केली असल्याचे स्कोअरकार्ड वरून स्पष्ट होते. अभिषेक कुमारला 720 पैकी 581 तर, शिवनंदन कुमारला 720 पैकी 483 गुण मिळाले आहेत. सध्या संजीव मुखियासह सिकंदर यादवांपासून अमित आनंदपर्यंत सगळे बिहार पोलिसांच्या रडारवर आले आहेत. याचा तपासही सुरु आहे. या प्रकरणात घडणारे प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवतच राहु.