बिहारमध्ये विषारी दारुचा पुन्हा कहर! मोतिहारीमध्ये 14 जणांचा मृत्यू

बिहारमध्ये विषारी दारुचा पुन्हा कहर! मोतिहारीमध्ये 14 जणांचा मृत्यू

Bihar Hooch Tragedy : बिहारमधील (Bihar) मोतिहारीमध्ये (Motihari)गेल्या दोन दिवसांत 14 जणांचा संशयास्पद मृत्यू (suspicious death)झाला आहे. विषारी दारु (poisonous liquor) पिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. पूर्व चंपारण (East Champaran)जिल्ह्यातील विविध भागात राहणाऱ्या डझनभर लोकांवर उपचार सुरू आहेत. त्यात काहींची दृष्टीही गेली आहे.

पटनाहून (Patna)दारूबंदी विभाग आणि एफएसएलची (FSL)टीम मोतिहारीला पोहोचली आहे. पोलिसांनी 7 जणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. मात्र, स्थानिक प्रशासनाने अद्यापही बनावट दारूमुळे मृत्यू झाल्याची पुष्टी केलेली नाही. आधी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Satya Pal Malik : IAS अधिकारी ते खळबळ उडवून देणारा नेता व्हाया राज्यपाल!

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पूर्व चंपारण जिल्ह्यात आणखी 8 जणांचा मृत्यू झाला. यातील 5 तुकौलियातील, दोन हरसिद्धी आणि एक पहारपूर येथील होते. शुक्रवारीही तुर्कौलियामध्ये 4 आणि पहारपूरमध्ये 4 जणांना जीव गमवावा लागला. दोन दिवसांत 14 जणांना जीव गमवावा लागला आहे. ही संख्या आणखी वाढू शकते. 10 जणांना मोतिहारी सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील दोघांना गंभीर अवस्थेत मुझफ्फरपूरला रेफर करण्यात आले आहे.

रुग्णालयात दाखल झालेल्या सर्व रूग्णांमध्ये दृष्टी कमी होण्याच्या आणि अस्वस्थतेच्या तक्रारी आढळून आल्या आहेत. त्याचवेळी, पोलीस मुख्यालयाने जिल्ह्यात आतापर्यंत चार मृत्यूची पुष्टी केली आहे. विषारी दारूमुळे मृत्यू झाल्याची शक्यता मुख्यालयाने व्यक्त केली आहे. स्थानिक प्रशासन दारूची पडताळणी करण्यास टाळाटाळ करत आहे.

मृतदेहाच्या शवविच्छेदनानंतर नेमके कारण समोर येईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. दरम्यान, पाटणा येथून दारुबंदी आणि एफएसएल पथके रवाना झाली आहेत. आतापर्यंत सात संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. काहींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube