Download App

NEET-UG 2024: नीटची पुन्हा परीक्षा घेता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, चार कारणेही दिली

संपूर्ण परीक्षा यंत्रणेत पद्धतशीर गडबड गोंधळ झालेला आहे, असेही म्हणता येणार नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे.

  • Written By: Last Updated:

NEET-UG 2024- Exam Supreme Court: नीटच्या (NEET-UG 2024) पेपर लीक आणि गैरप्रकाराच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) एक महत्त्वाचा निर्णय दिलाय. सर्व परीक्षा प्रक्रियामध्ये गैरप्रकार झालाय हे आढळून येत नाही. त्यामुळे पुन्हा परीक्षा (exam) घेण्याचे आदेश देता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने निकालात म्हटले आहे.

आशा सेविकांना 10 लाखांचा अपघाती विमा ते दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण; मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय!

पुन्हा परीक्षा घेण्याचे आदेश दिल्यास त्याचा फटका 23 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना फटका बसले. पुन्हा परीक्षा घेण्याचे आदेश दिल्यास विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वेळापत्रकही बिघडले जाईल. वैद्यकीय शिक्षणाच्या अभ्यासक्रमावर परिणाम होईल. भविष्यात वैद्यकीय व्यावसायिक उपलब्ध होण्यास अडचण निर्माण होईल. तसेच आरक्षित जागांवर विद्यार्थ्यांना त्याचा परिणाम भोगावा लागेल. त्यामुळे पुर्नपरीक्षा घेण्याचे आदेश देऊ शकत नसल्याने न्यायालयाने म्हटले आहे.



दोन केंद्रावर पेपर फुटले पण

झारखंडमधील हजारीबाग, बिहारमधील पाटणा येथील केंद्रांवर पेपर फुटले आहेत. परंतु सर्वच केंद्रांवर असे प्रकार घडल्याचे पुरावे नाहीत. संपूर्ण परीक्षा यंत्रणेत पद्धतशीर गडबड गोंधळ झालेला आहे, असेही म्हणता येणार नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, जे. बी. पारडीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या पीठाने नीट परीक्षा रद्द करण्याच्या याचिकेवर हा निर्णय दिला आहे.


आरक्षण बचाव यात्रेसाठी आंबेडकरांची जोरदार फिल्डिंग; पवारांसह सत्तेतल्या नेत्याला घातली गळ


योग्य उत्तर ठरवून गुणांची मोजणी करावी

एका प्रश्नासाठी दोन उत्तरे देण्यात आली आहे. त्यावर न्यायालयाने दिल्ली आयआयटीच्या तज्ज्ञ समितीकडून अहवाल मागितला होता. त्यात एकाच प्रश्नाचे दोन उत्तर असू शकत नाही. त्यामुळे चौथ्या क्रमांकाचे उत्तर योग्य ठरवून पुन्हा गुणांचे मोजमाप करून निकाल लावावा, असा आदेशही न्यायालयाने एनटीएला दिलाय.

follow us