NEET-UG परीक्षेतील विद्यार्थ्यांचे गुण ऑनलाईन अपलोड करा, सुप्रीम कोर्टाचा एनटीएला आदेश

NEET-UG परीक्षेतील विद्यार्थ्यांचे गुण ऑनलाईन अपलोड करा, सुप्रीम कोर्टाचा एनटीएला आदेश

NEET-UG 2024: NEET-UG 2024 परिक्षेचे पेपर फुटल्याचा आणि अनियमिततेचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) गुरुवारी (दि. 18 जुलै) सुनावणी झाली. यादरम्यान, न्यायालयाने एनटीएला (NTA) NEET-UG परीक्षेत विद्यार्थ्यांनी मिळवलेले गुण त्यांच्या वेबसाइटवर प्रकाशित करण्याचे निर्देश दिले.

NEET-UG परीक्षेतील विद्यार्थ्यांचे गुण ऑनलाईन अपलोड करा, सुप्रीम कोर्टाचा एनटीएला आदेश 

NEET मधील अनियमिततेशी संबंधित 38 याचिकांवर आज सरन्यायाधीश चंद्रचूड, न्यायमूर्ती जेबी परडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल टेस्टिंग एजन्सीला NEET UG 2024 च्या निकालाचा संपूर्ण डेटा ऑनलाइन अपलोड करण्याचे आदेश दिले आहेत. NTA ने NEET निकालाची शहरनिहाय आणि केंद्रनिहाय संपूर्ण यादी ऑनलाइन अपलोड करावी,असं कोर्टाने सांगितलं.

Janhvi Kapoor: अभिनेत्री जान्हवी कपूरची तब्येत बिघडली, मुंबईतील रुग्णालयात दाखल 

सर्वोच्च न्यायालयाने आदेश देताना म्हटले आहे की, UG NEET परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांचे क्रमांक सार्वजनिक करावेत, परंतु कोणत्याही विद्यार्थ्याची ओळख उघड होणार नाही याची काळजी घ्यावी. सर्वोच्च न्यायालयाने एनटीएला 20 जुलै रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत निकाल जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत. पुढील सुनावणी 22 जुलै रोजी निश्चित करण्यात आली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube