Janhvi Kapoor: अभिनेत्री जान्हवी कपूरची तब्येत बिघडली, मुंबईतील रुग्णालयात दाखल
Janhvi Kapoor Hospitalized In Mumbai : बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री जान्हवी कपूरला (Janhvi Kapoor) दक्षिण मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कुटुंबाच्या जवळच्या व्यक्तीने जान्हवी रुग्णालयात असल्याची माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार जान्हवी चेन्नईला गेली होती, मंगळवारी तिथून परतत असताना तिने विमानतळावर काहीतरी खायला घेतले होते. त्यामुळे अभिनेत्रीची तब्येत बिघडली आहे.
View this post on Instagram
घरी आल्यानंतर जान्हवीची तब्येत बिघडली होती आणि काल तिला खूप अशक्तपणा जाणवत होता. प्रकृती अस्वास्थ्यामुळे आणि अशक्तपणामुळे तिला बुधवारी डॉक्टरांच्या सल्ल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सध्या जान्हवीची प्रकृती ठीक असून शुक्रवारपर्यंत तिला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल, असे कौटुंबातील एका व्यक्तीने सांगितले आहे.
हॉस्पिटलमधून कधी डिस्चार्ज मिळेल?
कौटुंबिक एका व्यक्तीने सांगितले आहे की, जान्हवी कपूरची प्रकृती सध्या ठीक आहे. अभिनेत्रीलाही शुक्रवारपर्यंत रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे. जान्हवी कपूर सध्या तिच्या आगामी ‘उलज’ चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आली आहे.
Janhvi Kapoor : जान्हवी कपूरच्या ग्लॅमरस लूकची चर्चा
‘उलझ’ सिनेमामुळे चर्चेत
जान्हवी कपूरचा आगामी चित्रपट ‘उलज’चा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा चित्रपट 2 ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. जान्हवीही सध्या तिच्या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. सुधांशू सारियाच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटात जान्हवी कपूरसोबत अभिनेता गुलशन देवय्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय रोशन मॅथ्यू आणि आदिल हुसैन देखील या चित्रपटाचा भाग असणार आहेत. ‘उलज’ बॉक्स ऑफिसवर विक्रांत मॅसीच्या ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपटाशी टक्कर देणार आहे.
अंबानीच्या लग्नात जान्हवी कपूर चमकली
नुकतचं जान्हवी कपूर अंबानीच्या लग्नातील तिच्या लूकमुळे चर्चेत आली होती. मोराच्या ड्रेसपासून ते अभिनेत्रीच्या गोल्डन लेहेंग्यापर्यंत तिने चांगलीच लाइमलाइट मिळवली होती. यावेळी तिच्या बॉयफ्रेंड शिखर पहाडियासोबत देखील पाहायला मिळाला.