Download App

NEET-UG 2024: मोठी बातमीः प्रश्नाचे अचूक उत्तर IIT शोधणार, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

दिल्ली आयआयटीचे डायरेक्टर यांनी तीन जणांची एक्सपर्ट कमिती स्थापन करावे. तसेच प्रश्नाचे अचूक उत्तर द्यावे, असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे.

  • Written By: Last Updated:

Supreme Court NEET 2024 Judgement: नीट पेपरफुटीप्रकरणी (NEET 2024) एकीकडे सीबीआयकडून (CBI) तपास सुरू आहे. या प्रकरणी अनेक जणांना अटक झालेली आहे. या प्रकरणाचे पाळेमुळे शोधण्याचे काम सीबीआयकडून (CBI) सुरू आहे. तर दुसरीकडे नीट प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी सुरू आहे. नीट परीक्षेतील काही प्रश्नाचे उत्तरही अचूक नाहीत. भौतिकशास्त्रातील एका प्रश्नाचे अचूक उत्तर मिळविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली आयआयटीला एक आदेश दिला आहे. दिल्ली आयआयटीचे डायरेक्टर यांनी तीन जणांची एक्सपर्ट कमिती स्थापन करावे. तसेच प्रश्नाचे अचूक उत्तर द्यावे, असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे.


‘NTA’कडून नीट परीक्षेचा निकाल जाहीर; देशभरात झालेल्या गोंधळानतर झाली होती पुनर्परीक्षा

या उत्तराची माहिती मंगळवारी (दि. 23 जुलै) रोजी दुपारी बारावाजेपर्यंत द्यावे, असा आदेशात म्हटले आहे. नीटप्रकरणी उद्याही सुनावणी होणार आहे.
नीट परिक्षेतील प्रश्नपत्रिकेत 19 क्रमांकाचा भौतिकशास्त्राबाबत एक प्रश्न आहे. या प्रश्नाचे दोन उत्तर असल्याचे ठरवून एनटीएने गुण दिले आहेत.यालाही विद्यार्थ्यांनी न्यायालयात आव्हान दिले आहे. याचा चार लाख विद्यार्थ्यांना फायदा झाला आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली आयआयटीला तज्ज्ञ समितीद्वारे याचा उत्तर शोधण्यास सांगितले आहे.

मुख्य न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. बी. पारदीवाला, न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या पीठासमोर ही सुनावणी सुरू आहे. नीट परीक्षेतील गैरप्रकाराप्रकरणी चाळीस याचिका सुप्रिम कोर्टात दाखल आहेत. या याचिकेची एकत्र सुनावणी सुरू आहे.

एनटीएची झाडाझडती

नॅशनल टेस्टिंग एजन्सीची सर्वोच्च न्यायालयाकडून (National Testing Agency) झाडाझडती सुरू आहे. सर्व विद्यार्थ्यांचे गुण हे शहर आणि केंद्रानिहाय वेबसाइटवर जाहीर करण्याचे आदेश न्यायालयाने एनटीएला दिले होते. त्यानंतर एनटीए असे गुण वेबसाइटवर जाहीर केले आहेत.

(NEET-UG 2024| Supreme Court Seeks IIT-Delhi Expert Opinion On Correct Answer Of ‘Ambiguous’ Question)

follow us