मागील पेपर लीक प्रकरणांतून कोणताही धडा…सुप्रीम कोर्टाने एनटीएला फटकारत केंद्राला काढली नोटीस

NEET-UG 2026-NEET-UG 2026-ही याचिका फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशन (FAIMA) यांनी दाखल केली होती.

Supreme Court On Obc Reservation

Supreme Court On Obc Reservation

NEET-UG 2026: नीट पेपर लीकप्रकरणात (NEET Paper Leak) सर्वोच्च न्यायालयाने (Supreme court) एनटीएला (NTA) कठोर शब्दात फटकारलं आहे. मागील पेपर लीक प्रकरणांतून अद्याप कोणताही धडा घेतलेला दिसत नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फटकारले आहे. तसेच केंद्र सरकार आणि शिक्षण मंत्रालयाला नोटीस बजावली आहे. तसेच, यापूर्वीच्या आदेशानुसार स्थापन करण्यात येणाऱ्या मॉनिटरिंग समितीबाबत काय कार्यवाही झाली आहे, याचे स्पष्टीकरण एनटीएकडून मागवले आहे.

व्हायरल व्हिडिओमुळे नाशिक जेल प्रशासन अडचणीत; आरोपीसोबत संबंधांच्या चर्चांनंतर अधिकाऱ्यांना खुलाशाचे आदेश

ही याचिका फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशन (FAIMA) यांनी दाखल केली होती. यामध्ये NEET-UG 2026 परीक्षेच्या आयोजनात एनटीएकडून झालेल्या कथित प्रणालीगत अपयशाला आव्हान देण्यात आले आहे. न्यायालयाच्या देखरेखीखाली परीक्षा पुन्हा घेण्यात यावी आणि NTA चे पुनर्गठन किंवा त्याऐवजी नवीन सक्षम संस्था नियुक्त करण्यात यावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.


आसगावात सुन्न करणारा आक्रोश; आंबेनळी घाटात एकाच गल्लीतल्या 5 तरुणांचा मृत्यू, नागरिकांचा सरकारवर आरोप


याचिकेत काय-काय मागण्या ?

वकील तन्वी दुबे यांच्या माध्यमातून याचिका दाखल केलेली आहे. NEET सारख्या महत्त्वाच्या परीक्षा घेण्यासाठी NTA ऐवजी अधिक मजबूत, तांत्रिकदृष्ट्या सक्षम आणि स्वायत्त संस्थेची नियुक्ती करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.


विरोधकांनंतर आता सत्ताधाऱ्यांचाच सवाल; उदयनराजेंनी लाडकी बहीण योजनेवर व्यक्त केली चिंता

नवीन स्वतंत्र परीक्षा संस्था स्थापन होईपर्यंत NEET-UG 2026 ची पुनर्परीक्षा घेण्यासाठी उच्चस्तरीय देखरेख समिती स्थापन करण्यात यावी. या समितीच्या अध्यक्षस्थानी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश असावेत तसेच त्यामध्ये सायबर सुरक्षा तज्ज्ञ आणि फॉरेन्सिक वैज्ञानिकांचाही समावेश असावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

Exit mobile version