नेपाळमध्ये अडकलेल्या साताऱ्यातील 10 महिला पर्यटक सुरक्षित; प्रशासनाकडून हेल्पलाईन क्रमांक जारी

Nepal Flood या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष सुरू केला आहे.

Nepal Flood 2

Nepal Flood 2

Nepal Flood 10 female tourists from Satara stranded in Nepal are safe administration issues helpline number : नेपाळमध्ये आलेल्या महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून काही पर्यटक अडकून पडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. दरम्यान, महाबळेश्वर येथून पर्यटनासाठी नेपाळला गेलेल्या 10 महिला पर्यटक सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. या महिला सध्या पोखरा येथील एका हॉटेलमध्ये वास्तव्यास असून प्रशासनाचा त्यांच्याशी संपर्क झाला आहे.

मोहन भागवतांच्या न्यूयॉर्कमध्ये कार्यक्रम; ममदानींच्या विरोधामुळे महाराष्ट्रात राजकीय वाद

नेपाळच्या रसुवा जिल्ह्यातील भोटेकोशी नदीला आलेल्या महापुरामुळे अनेक भागांमध्ये परिस्थिती गंभीर झाली आहे. पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून विविध देशांतून नेपाळमध्ये गेलेल्या पर्यटकांच्या सुरक्षिततेची माहिती प्रशासनाकडून घेतली जात आहे. सातारा जिल्हा प्रशासनानेही परिस्थितीवर लक्ष ठेवले असून आवश्यक त्या उपाययोजना सुरू केल्या आहेत.

21 वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर; शनिवारी सुनेत्रा पवारांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

नेपाळमध्ये पूरस्थितीमुळे सातारा जिल्ह्यातील कोणता पर्यटक अडकला असेल किंवा एखाद्या पर्यटकाचा आपल्या कुटुंबीयांशी संपर्क होत नसेल, तर संबंधित नातेवाईकांनी तातडीने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

या क्रमांकांवर संपर्क साधता येणार

दूरध्वनी : ०२१६२-२३२३४९, २३२१७५
मोबाइल : ९६५७५२११२२

पर्यटकांची माहिती प्रशासनाला देण्याचे आवाहन

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकाबाबत प्रशासनाला माहिती देताना संबंधित व्यक्तीचे नाव, मोबाइल क्रमांक, नेपाळमधील सध्याचे ठिकाण किंवा हॉटेल, प्रवासाची माहिती आणि कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक उपलब्ध असल्यास तो द्यावा, असे प्रशासनाने सांगितले आहे. पूरग्रस्त भागातील नागरिक आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी स्थानिक यंत्रणांशी समन्वय साधण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील नागरिकांनी अफवा किंवा अपुऱ्या माहितीकडे लक्ष न देता अधिकृत माहितीसाठी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version