Download App

नेपाळसह भारतात राजेशाही लागू करा; शं‍कराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मागणी…

नेपाळसह भारतात राजेशाही लागू करा, अशी मागणी ज्योतिषपीठाचे शंकाराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केलीयं.

Shankarachrya Avimukteshwar Sarswati : नेपाळसह भारतात राजेशाही लागू करा, अशी मागणी ज्योतिषपीठाचे शंकाराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केलीयं. शं‍कराचार्यांनी वाराणसीत केलेल्या मागणीनंतर आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय.

पुण्यात “EDUCONTECH-25” राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन, शैक्षणिक क्षेत्रातील व्यवसायाला नवे वळण देणारा उपक्रम : दीपक बगाडे

नेपाळमध्ये जोपर्यंत राजेशाही होती, तोपर्यंत देशात कुठलाही गोंधळ किंवा अराजकता नव्हती. चीनने यांना पुढे करुन नेपाळमध्ये लोकशाहीचा माहौल तयार केला पण जनतेत असंतोष आहे, पुन्हा राजेशाहीची मागणी होत असल्याचं शं‍कराचार्यांनी म्हटलंय.

काका, नातवासाठीच्या टेस्लारूपी खेळण्यासाठी पैसे कुठून आले? राजकारण्यांसह सरनाईंकांना अस्ताद काळेची टोलेबाजी

हिंदू समाजाची मुलभूत शासन व्यवस्था राजेशाही…
हिंदू समाजाची मुलभूत शासन व्यवस्था ही राजेशाही असून जगात एक तरी राष्ट्र असावं जिथं वेदमंत्रांच्या आधाराने राज्याभिषेक झालेला राजा कारभार पाहील, त्या माध्यमातून जगाला हिंदू परंपरेचे महत्व दाखवता येईल, असंही शं‍कराचार्यांनी स्पष्ट केलंय.

भारतातही राजेशाहीची गरज…
नेपाळच नाही तर भारतातही पुन्हा राजेशाही हवी आहे, भारता हिंदू बहुसंख्य असूनही देशात सनातनी समाजाला दुसऱ्या दर्जाचा नागरिक मानले जात आहे. देशातील अल्पसंख्यांकांसाठी तब्बल 300 योजना सुरु आहेत,त्यांची प्रत्येक मागणी मान्य केली जाते. पण 100 कोटींपेक्षा अधिक सनातनींचे ऐकलं जात नाही, असाही आरोप शंकाराचार्यांनी केलायं.

follow us