Download App

धक्कादायक! चार मजली इमारत कोसळून चौघांचा मृत्यू; अनेकजण ढिगाऱ्याखाली दबले

शनिवारी सकाळी मुस्तफाबादमध्ये एक इमारत अचानक कोसळली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबून चार नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

Delhi Building Collapse : दिल्लीतील मुस्तफाबादमध्ये एक मोठी (Delhi News) दु्र्घटना घडली आहे. शनिवारी सकाळी मुस्तफाबादमध्ये एक इमारत (Building Collapse) अचानक कोसळली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबून चार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय आपत्ती प्रतिक्रिया दल आणि दिल्ली पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. त्यांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले आहे.

डिविजनल फायर ऑफीसर राजेंद्र अटवाल यांनी सांगितले की शनिवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास इमारत कोसळल्याची माहिती मिळाली. आम्ही तत्काळ घटनास्थळी दाखल झालो. येथे आल्यानंतर लक्षात आले की संपूर्ण इमारतच कोसळली आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्यात अनेकजण अडकून पडले आहेत. एनडीआरएफ, दिल्ली अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले.

बापरे! फक्त शरीरावरच नाही तर मेंदूवरही परिणाम करतो ‘हा’ आजार; धक्कादायक अहवाल

या ढिगाऱ्याखाली दबून चार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.  या लोकांना बाहेर काढण्याचे काम केले जात आहे. या ढिगाऱ्याखाली दबून आणखी लोकांचा मृत्यू  झाला असावा अशी भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, ही इमारत अचानक का कोसळली याची ठोस माहिती अजून मिळाेली नाही. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. त्यांच्या तपासानंतरच या अपघातातील माहिती समोर येईल.

शुक्रवारी दिल्लीतील हवामानात मोठा बदल दिसून आला. रात्री मुसळधार पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी इमारती कोसळल्याचे सांगण्यात येत होते. दिल्लीतील मुस्तफाबादमधील इमारत कोसळण्यामागे हेच कारण होते का याचाही तपास केला जात आहे. मागील आठवड्यात वादळात मधुविहार पोलीस स्टेशनजवळ बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीची भिंत कोसळली होती. या दुर्घटनेत एक व्यक्तीचा मृत्यू झाला होता. तसेच दोन जण जखमी झाले होते.

Hingoli : ट्रॅक्टरचा भीषण अपघात; आठ महिलांचा मृत्यू, शेतमजुराने सांगितला थरार

follow us