Hingoli : ट्रॅक्टरचा भीषण अपघात; आठ महिलांचा मृत्यू, शेतमजुराने सांगितला थरार

Hingoli Tractor Accident : हिंगोलीतील वसमत तालुक्यातील गुंज येथे शेतमुजरी करणाऱ्या महिलांना घेऊन जात असलेल्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात (Hingoli Tractor Accident ) झाल्याची घटना घडली. या घटनेत एकूण 8 महिलांचा मृत्यू झाला असून 2 महिलांना विहीरीबाहेर काढण्यात यथ आलंय. अपघात घडल्यानंतर शेजारील शेतात काम करणाऱ्या शेतमजुराने अपघाताचा थरार सांगिलायं.
तनिषा भिसे यांचा मृत्यू एक ‘सिस्टम अलर्ट’; सुनेत्रा पवारांच्या पोस्टनंतर अजितदादांना आली जाग
अपघात प्रत्यक्षदर्शी पुरभाजी सरोदे असं या शेतकऱ्याचं नाव असून हा शेतमजूर शेतात काम करीत असताना ट्रॅक्टर शेतातून चालला होता. ट्रॅक्टरचा अपघात कसा घडला याचं नेमकं कारण शेतमजूराला माहित नसल्याचं त्याने सांगितलंय. मात्र, शेतातून जात असताना चालकाला शेतातील विहीरीचा अंदाज न आल्याने ट्रॅक्टर थेट खोल विहीरीत पडला. यावेळी ट्रॅक्टरचालकाने उडी घेत स्वत:चा जीव वाचवला.
त्यानंतर या ट्रॅक्टरचालकाने तेथून पळ काढला. अपघात घडल्यानंतर आरडा-ओरडा सुरु झाल्यानंतर शेतमजुराने विहीरीच्या दिशेने धाव घेत दोन महिलांना वाचवले मात्र स्वत:च्या पत्नीला वाचवण्यात शेजमजूर अपयश ठरला.
खोक्या भोसलेला वन विभागाच्या कोठडीत मारहाण; न्यायालयात वकिलांनी केला खळबळजनक दावा
पुरभाजी सरोदे यांनी पुढे सांगितलेृ, अपघात नेमका कसा झाला हे मला माहिती नाही. पण अपघातानंतर चालक पळून गेला. या ट्रॅक्टरमध्ये एकूण 12 जण होते. यामधील 3 जणांचे प्राण वाचवले. या अपघातानंतर मृतांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावर एकच आक्रोश करण्यात आला आहे. आडरानात ट्रॅक्टर आणल्यामुळे हा अपघात झाल्याचे म्हणणे आहे. त्या ट्रॅक्टर चालकालाच विहिरीमध्ये टाकून द्या, असे एका महिलेने सांगितले.