खोक्या भोसलेला वन विभागाच्या कोठडीत मारहाण; न्यायालयात वकिलांनी केला खळबळजनक दावा

Satish Bhosale Khokya : बीड जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील सतीश भोसले उर्फ खोक्या (Khokya) याचे काही कारणामे समोर आले. त्यानंतर आता हा खोक्या पोलिसांच्या ताब्यात आहे. असं असतानाच आता या खोक्याला वन विभागाच्या कोठडीत असताना मारहाण झाल्याचं म्हटलं जात आहे. या मारहाणीचे फोटो व्हायरल जाल्यानंतर आता खोक्याला पुन्हा न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं?
वन विभागाच्या कोठडीत खोक्या भोसले याला मारहाण झाल्याचा दावा केला जातोय. खोक्याच्या वकिलाने तसा दावा केला आहे. खोक्याला मारहाण झाल्यानंतर वळ उठल्याचे कथित फोटो व्हायरल झाले आहेत. या मारहाणीच्या दाव्यानंतर आता खोक्या भोसलेले पुन्हा एकदा न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे अशी माहिती समोर आली आहे.
अॅडमिट होण्याआधीच 10 लाख मागितले, गर्भवती महिलेचा मृत्यू दिनानाथ रुग्णालयावर भाजप आमदाराचा आरोप
सकाळपासून खोक्या उर्फ सतीश भोसले याला वन विभागाने ताब्यात गेतले होते. ताब्यात घेतल्यानंतर त्याला मारहाण झाल्याचं त्याच्या वकिलानं म्हटलं आहे. समोर आलेल्या फोटोंचा आधार घेत वकिलाने सतीश भोसले याला न्यायालयीन कोठडी द्यावी, अशी मागणी केली. वकिलाची ही मागणी न्यायालयाने मान्य केली आहे.
खोक्यावर नेमके आरोप काय आहेत?
गेल्या काही दिवसांपूर्वी खोक्या भोसले चांगलाच चर्चेत आला होता. खोक्यावर एकूण दोन गुन्हे दाखल आहेत. पहिला गुन्हा हा ढाकणे पिता-पुत्रांना मारहाण करणे हा आहे. तर दुसरा गुन्हा हा हरणांची शिकार केल्याचा आहे. गेल्या काही दिवसांपासून तो पोलिसांना गुंगारा देऊन पळत होता. त्याला उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमधून बेड्या ठोकण्यात आल्या होत्या.