Download App

Stock Market : RBI चा निर्णय पावला! ‘निफ्टी’चा नवा पत्ता 21000; सेन्सेक्सचीही घोडदौड

Stock Market Increase : भारतीय रिजर्व बँकेने रेपो रेट जैसे थे ठेवण्याची घोषणा केल्यानंतर आज शेअर बाजारात (Stock Market Increase) तेजी दिसून आली. निफ्टीने नवा उच्चांक गाठत 21000 चा आकडा गाठला. दुसरीकडे सेन्सेक्समध्ये सुद्धा अनपेक्षित वाढ नोंदवण्यात आली. सेन्सेक्समध्ये थोडीथोडकी नाही तर तब्बल 300 टक्के वाढ नोंदवली गेली असून हा आकडा लवकरच 70 हजार पार पोहोचण्याची शक्यता दिसत आहे. तीन दिवस पार पडलेल्या रिजर्व बँकेच्या पतधोरण बैठकीत रेपो रेट जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. व्याजदरात कोणताही बदल करण्यात आला नाही. त्यामुळे सध्या होम लोन, कार लोनसह अन्य प्रकारच्या कर्जाचे EMI जैसे थे राहणार आहेत. त्यात कोणतीही वाढ होणार नाही. पतधोरण समितीने पॉलिसी रेपो दर 6.5 टक्क्यांवर कायम ठेवण्याचा निर्णय एकमताने घेतल्याचे गव्हर्नर शक्तीकांता दास (Shaktikanta Das) यांनी सांगितले. तर, कायमस्वरूपी ठेव सुविधा रेट 6.25 टक्के आणि सीमांत कायमस्वरूपी सुविधा आणि बँक रेट 6.75 टक्के राहील असे स्पष्ट केले आहे.

शेअर बाजारामधील तेजीला ब्रेक, तरीही गुंतवणूकदारांना 1.32 लाख कोटींचा नाफ

बँकेच्या या निर्णयाआधी सुद्धा शेअर बाजार वेगाने घोडदौड करत होता. मात्र निर्णयानंतर निफ्टीने नवा इतिहासच रचला. असं पहिल्यांदाच घडतंय की Nifty 21000 आकड्यावर पोहोचला आहे. या वर्षातील जानेवारीपासून आतापर्यंत निफ्टीत 15.36 टक्के वाढ नोंदवण्यात आली. तर एक वर्षाच्या काळात निफ्टीने 12.80 टक्क्यांची झेप घेतली आहे.

फक्त निफ्टीच नाही तर सेन्सेक्स सुद्धा इतिहास रचण्याच्या मार्गावर आहे. शुक्रवारी रिजर्व बँकेच्या निर्णयानंतर 0.43 टक्क्यांच्या वाढीसह 69,821 वर व्यवहार करत होता. आता असे सांगितले जात आहे की सेन्सेक्स लवकरच 70 हजारांचा टप्पा पार करील. जानेवारीपासून आतापर्यंत सेन्सेक्समध्ये 14.14 टक्के वाढ झाली आहे. तसेच सहा महिन्यांच्या काळात 11.09 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. एका वर्षात सेन्सेक्सने 11.60 टक्के झेप घेतली आहे.

तीन राज्यात भाजपची सत्ता; शेअर बाजारात मोठी उलाढाल, गुंतवणुकदार मालामाल.. 

Tags

follow us

वेब स्टोरीज