Nitish Kumar on Narendra Modi : बिहारमध्ये (Bihar Politics) सत्तांतर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) पहिल्यांदाच एका मंचावर आले होते. पंतप्रधानांनी औरंगाबादमध्ये अनेक प्रकल्पांचे उद्घाटन केले. यावेळी नितीश कुमार यांनी जोरदार भाषण केलं. नितीश कुमार यांच्या बिहारी स्टाईलमधील टोलेबाजीने पंतप्रधानही जोरजोरात हसायला लागले. नितीश कुमार म्हणाले, तुम्ही याआधीही इथे आला होतात पण आम्ही गायब झालो होतो, पण आता आम्ही पुन्हा इकडे-तिकडे करणार नाही, असा विश्वास देतो.
नितीश कुमार म्हणाले, बिहारमध्ये खूप काम सुरू आहे, ती कामं आता गती पूर्ण केली जातील’ असे म्हटल्यावर पीएम मोदी हसायला लागले. सीएम नितीश पुन्हा हसले आणि म्हणाले, तुम्ही इथे आलात याचा मला खूप आनंद आहे, आधीही तुम्ही आला होता. पण मीच गायब झालो होतो. पण यानिमित्ताने आश्वासन देतो की आता इकडे तिकडे करणार नाही. आम्ही फक्त तुमच्यासोबत राहू.
पुण्यात मोठी कारवाई! पुणे पोलिसांनी पुन्हा जप्त केले 340 किलो ड्रग्स, आरोपींना अटक
नितीश कुमार यांनी अलीकडेच महाआघाडीशी संबंध तोडून भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. त्यांनी एकाच टर्ममध्ये अनेक वेळा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याचा विक्रम केला आहे. पीएम मोदींचा बिहार दौरा खूप दिवसांपासून ठरला होता. नितीश कुमार म्हणाले की, आपण 2005 पासून एकत्र आहोत. याकाळात सतत काम केले आहे. याआधी एकही काम झाले नव्हते. लोकांना फिरायला जागा नव्हती, शिक्षण मिळत नव्हते परंतु आपण 2005 पासून एकत्र असल्यापासून सर्व काम केली आहेत.
सात दिवसांतच ‘आर्टिकल 370’चा वेग मंदावला, कमावले फक्त इतके कोटी, तर ‘क्रॅक’नेही केली निराशा
मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, बिहारचा विकास व्हावा अशी आमची इच्छा आहे. तुमच्या नेतृत्वाखाली राज्यात मोठी कामं सुरु आहेत. यातून राज्यातील प्रत्येक व्यक्तीचे कल्याण व्हावे आणि सर्वांनी पुढे जावे. ते पुढं हसत म्हणाले, मला खूप आनंद झाला आहे की आज पंतप्रधान आले आहेत. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की मोदीजी बिहारमध्ये येतच राहतील. यावेळी नितीश कुमार यांनी ‘अबकी बार 400 पार’ या घोषणा दिल्या. ते म्हणाले, मला विश्वास आहे की आपण किमान 400 जागा जिंकणार आहेत. जे लोक इकडे-तिकडे करत आहेत त्यातून काहीही होणार नाही.
मोठी बातमी! गौतम गंभीर पाठोपाठ भाजपाला दुसरा धक्का, ज्येष्ठ नेत्याची राजकीय निवृत्ती