Download App

Chandrayaan 3 Landing : मोहिम फत्ते! ‘आता चंद्रावरील दक्षिण ध्रुव आमचाच’; जगाचा भारताला सलाम…

जगभराचं लक्ष वेधून घेतलेल्या चांद्रयान-3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपलं सॉफ्ट लॅंडिग केलं आहे. चांद्रयानाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लॅंडिंग करताच भारताचा तिंरंगा झेंडा फडकावत हा ध्रुव आता आमचाच असल्याचं जगाला दाखवून दिलं आहे. त्यामुळे भारताला जगभरातून सलाम करण्यात येत आहेत. चांद्रयान चंद्रावर लॅंडिंग होताच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाणारा भारत पहिला देश असल्याचं चांद्रयान -3 मोहिमेचे प्रकल्प संचालक पी वीरमुथूवेल यांनी स्पष्ट केलं आहे.

चंद्रावर याआधीही रशिया, अमेरिका आणि चीनने पाऊल ठेवलं आहे. या तिन्ही देशांनंतर आता भारतानेही चंद्रावर पाऊल ठेवत तिरंगा फडकावला आहे. तसेच दक्षिण ध्रुवावर ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा पहिलाच देश ठरणार आहे. “आम्ही चंद्रावर ‘सॉफ्ट लँडिंग’मध्ये यश मिळवले आहे, भारत चंद्रावर आहे”, असं इस्त्रोचे प्रमुख सोमनाथ म्हणाले आहेत.

VIDEO : PM मोदींची ब्रिक्स स्टेजवरील ‘ही’ कृती अभिमानास्पद; अनेकांकडून कौतुक, नेमकं घडलं तरी काय?

चांद्रयान-3 लँडर मॉड्यूलच्या यशस्वी सॉफ्ट लँडिंगनंतर बेंगळुरूमधील इस्रोच्या मिशन ऑपरेशन्स कॉम्प्लेक्समध्ये जल्लोष सुरू आहे. इस्रोने ट्विट करून सांगितलंयं की, चांद्रयान 3 आपले लक्ष्य गाठले आहे. इस्रोनेही भारतीयांचे अभिनंदन केले आहे.

दक्षिण ध्रुवावर उतरणं आव्हानात्मक :
चांद्रयान-3 चं दक्षिण ध्रुवावर उतरणं खूप महत्त्वाचं मानलं जात होतं. कारण चंद्राच्या दक्षिण भागात बराच काळोख आहे, त्यामुळे आतापर्यंत कोणत्याही देशाने आपले यान या भागात उतरवले नव्हते. फक्त अमेरिकेने 10 जानेवारी 1968 रोजी या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला होता, आज भारताचे ज्या ठिकाणी चांद्रयान-3 उतरले त्या ठिकाणाहून बऱ्याच अंतरावर अमेरिकेचे सर्वेअर-7 यान दक्षिण ध्रुवावर उतरले आहे.

Tags

follow us