Download App

Odisha Train Accident : भय इथले संपत नाही! शवगृह बनलेल्या ‘त्या’ शाळेकडे विद्यार्थ्यांची पाठ

Odisha Train Accident : ओडिशातील तीन रेल्वेंच्या झालेल्या भीषण अपघातामध्ये आतापर्यंत तब्बल 294 प्रवाशांचा मृत्यू झाला. या अपघातामधील मृतदेह जवळच असणाऱ्या बहनगा हायस्कूलमध्ये (Behnaga High School)ठेवण्यात आले. त्यामुळे काही काळापुरती ही शाळा शवगृह (School Mortuary)बनली होती. असं जरी असलं तरी आता या शवगृह बनलेल्या शाळेत जायला विद्यार्थी घाबरत आहेत. त्यामुळे आता शाळेसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे आता शाळा व्यवस्थापन समितीने ही शाळेची इमारत पाडण्याची विनंती राज्य सरकारकडे केली आहे.

Odisha Train Accident : प्रवाशांना लागला डोळा अन् तेवढ्यात.. रेल्वे अपघाताचा थरारक व्हिडीओ

2 जून रोजीला झालेल्या दुर्घटनेमध्ये मृत पावलेल्यांचे मृतदेह या 65 वर्षांच्या शाळेत ठेवण्यात आले होते. शाळेच्या वर्गांमध्ये मृतदेहांचे ढीगच ढीग लागले. त्याचवेळी मृतांची ओळख पटवण्यासाठी नातेवाईकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळाले.

यामध्ये अनेक मृतदेहांचे तुकडे-तुकडे झाले आहेत,तर काही विजेच्या धक्क्याने चांगलेच भाजले आहेत. अशा परिस्थितीत मृतदेहांची ओळख पटवणे म्हणजे नातेवाईकांसाठी मोठे आव्हाण ठरले आहे. मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी नातेवाईकांचा आकांत तांडव सुरु होता.

Crime News : मीरा रोड हत्याकांडात नवा ट्विस्ट; नराधमाचा धक्कादायक खुलासा

आता ही शाळा तर शवगृहातच बदलली. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना या शाळेत जाण्याची भीती वाटू लागली आहे. विद्यार्थ्यांनी शाळेत जाण्यास घाबरत आहेत. एवढ्या सर्व प्रकारानंतर विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी शाळेकडे नाखुशी दर्शवली आहे. त्यामुळे आता शाळा व्यवस्थापन समितीने ही शाळेची इमारत पाडण्याची विनंती राज्य सरकारकडे केली आहे.

तरुण विद्यार्थी घाबरले आहेत, बहनगा हायस्कूलच्या मुख्याध्यापिका प्रमिला स्वेन यांनी कबूल केले की शाळेने त्यांच्या भीतीवर मात करण्यासाठी आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित करण्याची आणि काही विधींचे पालन करण्याची योजना आखली आहे. त्यांनी सांगितले की शाळेतील काही ज्येष्ठ विद्यार्थी आणि एनसीसी कॅडेट बचाव कार्यात सामील झाले होते.

बालासोरचे जिल्हाधिकारी दत्तात्रय भाऊसाहेब शिंदे यांनी शाळा आणि जनशिक्षण विभागाच्या निर्देशानुसार गुरुवारी शाळेला भेट दिली, ते म्हणाले, मी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, मुख्याध्यापिका, इतर कर्मचारी आणि स्थानिक लोकांची भेट घेतली आहे. त्यांना जुनी इमारत पाडून तिचे नूतनीकरण करायचे आहे, जेणेकरून मुलांना वर्गात जाण्याची भीती किंवा भीती वाटू नये.

Tags

follow us