Odisha Train Accident: ओडिशाच्या बालासोर येथे शुक्रवारी (2 जून) रेल्वेचा अपघात झाला. या अपघातामध्ये जवळपास 300 लोकांना आपला जीव गमवावा लागला. यामध्ये 900 अधिक लोक जखमी झाले. हे सर्व बचाव कार्य सुरु असताना रेल्वेचा रुळावर रेस्क्यू टीमला एक डायरी मिळाली. एकीकडे मृतांचा ढीग तर दुसरीकडे प्रेमकथा असलेली ती डायरी. एवढ्या मोठ्या अपघातानंतर ती प्रेमकथा जिवंत रहाते. या डायरीची विखुरलेली पाने ही प्रेमकथा जिवंत करतात. या डायरीमध्ये बंगाली भाषेमध्ये ‘तुम मेरे दिल के पास हो’ अशी कविता लिहिलेली दिसली. तर काही पानांवर मासे, सूर्य आणि हत्ती यांची छायाचित्रे काढून प्रेम व्यक्त केले होते. मानले जाते की एका प्रवाशाने त्याच्या सुट्ट्यांमध्ये आपल्या प्रेमाच्या नावाने ते लिहिले होते. मात्र, या प्रवाशाबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.
मला तुझ्यावर कायम प्रेम करायचं आहे – कविता
या पानांवर बंगालीमध्ये लिहिल्या गेलेल्या ओळी पुढीलप्रमाणे आहेत… “अल्पो अल्पो मेघ थेके हलका ब्रिस्ती है, छोटा छोटा गोलपो थेके भालोबासा सृष्टी है.” बंगाली भाषेत लिहिलेल्या या कवितेचे बोल म्हणजे- “मला तुझ्यावर सदैव प्रेम करायचे आहे, तू माझ्या हृदयाच्या जवळ आहेस.” प्रेमाने लिहिलेली ही पाने सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
Odisha Train Accident : सिग्नल कायम ठेवला तर अपघात टळला असता…
रेस्क्यू ऑपरेशन टीमने ही पाने सुरक्षित ठेवली
बचाव कार्यात सहभागी असलेले पथक आणि स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, कवितांची ही पाने जतन करण्यात आली आहेत. आत्तापर्यंत कोणीही या कवितेशी किंवा तिच्या लेखकाशी संबंध असल्याचा दावा केलेला नाही. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही कविता कोणी लिहिली आहे, याबाबत कोणतीही माहिती नाही.
2 जून रोजी झालेल्या या अपघातात 275 जणांचा मृत्यू झाला होता, तर 1000 हून अधिक लोक जखमी झाले होते. जखमींवर बालासोर ते कटक आणि भुवनेश्वर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.