Odisha Train Accident : सिग्नल कायम ठेवला तर अपघात टळला असता…
Odisha Train Accident : ओडिशामधल्या रेल्वे अपघाताचं कारण अखेर समोर आलं आहे. खुद्द केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबतचा खुलासा केला आहे. या अपघाताची रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून सखोल चौकशी करण्यात आल्यानंतर अखेर अपघाताचं कारण स्पष्ट झालं आहे.
खासदार अमोल कोल्हेंचे पीए असल्याची बतावणी करून पोलिसांना गंडवलं; गुन्हा दाखल
प्राथमिक अहवालानूसार, कोरोमंडल एक्सप्रेस बहनगा बाजार स्थानकापूर्वी, ते मुख्य मार्गाऐवजी लूप लाइनवर गेली होती. ही कोरोमंडल एक्सप्रेस तिथं थांबलेल्या मालगाडीला धडकली. त्याआधी कोरोमंडल एक्सप्रेसला अप मेनलाईन सिग्नल देण्यात आला. मात्र, नंतर तो काढून टाकण्यात आल्याने गाडी लूप लाईनमध्ये शिरली असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आलीय.
गोपीनाथ मुंडेंची एक भेट अन् काँग्रेसने उमेदवाराचे तिकीटच कापले; तावडेंनी सांगितला खास किस्सा
इथल्या मालगाडीला एक्सप्रेस धडकल्यानंतर गाडीचे काही डबे रुळावरून घसरले. दरम्यान, बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस डाऊन मेन लाइनवरून गेली आणि रुळावरून घसरलेल्या कोरोमंडल एक्स्प्रेसच्या डब्याला धडकल्याने तिचे दोन डबे उलटले. त्यामुळे अपघाताची घटना घडलीय.
बीड : नाराजी नाट्य संपलं?; मुंडे बंधू-भगिनी एकत्र येण्याची परळीत पायाभरणी
दरम्यान, रेल्वे आयुक्तांच्या अहवालानूसार हा अपघात इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमध्ये बदल झाल्यामुळे हा अपघात झाल्याचा खुलासा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केला आहे. या अपघातानंतर अद्यापही रेल्वेच्या डब्यातील मृत प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरु असून रेल्वेमंत्री वैष्णव यांनी सलग दुसऱ्या दिवशीही पाहणी केली आहे.
या अपघातातील मृतांचा आकडा वाढतच चालला असून आत्तापर्यंत 288 जणांचा मृत्यू झाला असून 1100 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात जखमी प्रवाशांचा आकडा आणखी वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या घटनेनंतर जगभरात खळबळ उडाली.