Omar Abdullah News : नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला (Omar Abdullah) यांनी सातत्याने भाजपच्या (BJP) नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी हे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार होते. त्यावेळी भाजपच्या जाहीरनाम्यात कलम ३७० हटणार असल्याचं नमूद होतं. त्यावेळी अब्दुल्ला यांनी भाजप आणि मोदींना विरोध केला. मोदी सत्तेत आल्यास आणि कलम ३७० हटवल्यास जम्मू – काश्मीर भारताच भाग राहणार नाही, असं ते म्हणाले होते. हाच धागा पकडून अंशुल सक्सेना (Anshul Saxena) यांनी ओमर अब्दुला यांना जोरदार टोला लगावला
अपारशक्ती खुराना अन् रोहित शर्माची जमली गट्टी; धमाल मस्तीचा व्हिडिओ व्हायरल…
अब्दुल्ला यांनी कलम ३७० ला सातत्याने विरोध केला होता. दरम्यान, मोदींच्या पंतप्रधान पदांच्या दुसऱ्या कार्यकाळात कलम ३७० हटवले गेले. आता जम्मू काश्मिरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम ३७० हटवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच जम्मू आणि काश्मीरच्या दौऱ्यावर आलेत. त्यानंतर अंशुल सक्सेना यांनी एक्सवर एक पोस्ट लिहिली. त्यात ते म्हणाले की, सर, ओमर अब्दुल्ला मी तुमचे सर्व शब्द आणि मे 2014 मध्ये हे ट्विट सेव्ह केले. आता याला जवळपास 10 वर्षे झाली. आता पुढे काय करायचे? ट्विट फ्रेम करू का? अशी खोचक विचारणा केली.
Sir @OmarAbdullah, I marked all of your words & saved this tweet in May 2014.
It’s been almost 10 years. Now, what to do next? Tweet frame karwa lu? pic.twitter.com/ZDEtOf5Pbt
— Anshul Saxena (@AskAnshul) March 7, 2024
२०१४ मध्ये ओमर अब्दुल्ला यांनी एक ट्विट केलं होतं. त्यात त्यांनी लिहिलं की होतं की, माझे हे शब्द आणि ट्विट तुम्ही जतन करा. मोदी सरकार सरकार सत्तेत आल्यास कलम ३७० हटवले जाईल. आणि तसं झालं तर जम्मू-कश्मीर भारताचा भाग राहणार नाही, असं म्हटलं होतं.
यापूर्वी जम्मू-काश्मीरात विकास नव्हता
दरम्यान, मोदी आज जम्मू काश्मिरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, मी याठिकाणी तुमची मनं जिंकण्यासाठी आलो आहे. जोपर्यंत मी तुमची मनं जिंकत नाही तोपर्यंत मी प्रयत्न करत राहीन. ही माझी गँरटी आहे. मोदी म्हणाले की, यापूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये विकास नव्हता. मात्र आता विकास सुरू झाला आहे. काश्मीरमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. गेल्या काही वर्षांत पर्यटनासाठी येणाऱ्या लोकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. परदेशी पर्यटक जम्मू-काश्मीरमध्ये आल्याशिवाय राहत नाहीत. जम्मू-काश्मीर हे देशाचं मस्तक आहे. जम्मू-काश्मीरच्या विकासाचे प्रयत्न केले जात आहेत. जम्मू-काश्मीरला स्मार्ट बनवण्यासाठी पायाभूत सुविधा वाढवल्या जाणार आहेत, असं मोदी म्हणाले.