कर्नाटकमध्ये परिक्षांसाठी ड्रेस-कोड : ओमर अब्दुल्ला, औवेसींचे बरसले; राजकीय वातावरण तापले

कर्नाटकमध्ये परिक्षांसाठी ड्रेस-कोड : ओमर अब्दुल्ला, औवेसींचे बरसले; राजकीय वातावरण तापले

नवी दिल्ली : “कोणी काय परिधान करावे आणि काय नाही, यात सरकार हस्तक्षेप का करत आहे? असे आदेश केवळ मुस्लिमांना लक्ष्य करण्यासाठी जारी केले जातात”, असे म्हणत जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी कर्नाटक (Karnataka) सरकारच्या परिक्षांमध्ये ड्रेस-कोड लागू करण्याच्या निर्णयावर निशाणा साधला आहे. ते बारामुल्ला येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ड्रेस-कोड लागू करण्याच्या निर्णयावर एआयएमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asududdin Owaisi) यांनीही मागील भाजप (BJP) सरकारचा संदर्भ देत काँग्रेसवर टीका केली आहे. (Omar Abdullah and Asaduddin Owaisi criticized Karnataka government’s decision to introduce dress-code in examinations)

कर्नाटक सरकारचा ड्रेस-कोड लागू करण्याचा निर्णय वादात :

कर्नाटकमध्ये 18 आणि 19 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विविध बोर्ड आणि कॉर्पोरेशनच्या भरती परीक्षांसाठी कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाने (KEA) ड्रेस कोड लागू केला आहे. या निर्णयानुसार, परीक्षा हॉलमध्ये डोके, तोंड किंवा कान झाकणारे कोणतेही कपडे किंवा टोपी घालण्याची परवानगी नाही. ब्लूटूथ उपकरणांचा वापर करून परीक्षेतील अनियमितता रोखण्याच्या प्रयत्नाचा हा एक भाग असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. मात्र याच निर्णयावरुन सध्या राजकीय वातावरण तापलं आहे.

“मुर्खों के सरदार”! काँग्रेस अन् राहुल गांधींवर PM मोदींची प्रखर शब्दात थेट टीका

‘काँग्रेसच्या राजवटीत असा आदेश येणे निराशाजनक आहे’ : ओमर अब्दुल्ला

ओमर अब्दुल्ला म्हणाले, “ही खेदाची बाब आहे. कोणी काय परिधान करावे आणि काय नाही, यात सरकार हस्तक्षेप का करत आहे? असे आदेश केवळ मुस्लिमांना लक्ष्य करण्यासाठी जारी केले जातात. पूर्वी कर्नाटक हे भाजपच्या अधिपत्याखाली होते, त्यामुळे असे आदेश येत होते तेव्हा आम्हाला आश्चर्य वाटले नाही. मात्र, काँग्रेसच्या राजवटीतही असे आदेश दिले जात आहेत हे निराशाजनक आहे. मी काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी आणि राहुल गांधींना कर्नाटकात जारी केलेल्या आदेशाचा फेरविचार करण्याची विनंती करणार आहे.

Telangana Election: काँग्रेसचे उमेदवार जी विवेकानंद सर्वात श्रीमंत उमेदवार, किती संपत्ती वाचा?

असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले?

असदुद्दीन ओवेसी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले, काँग्रेस सरकारने परीक्षांमध्ये हिजाबवर बंदी घातली आहे. तसेच मागील भाजप सरकारची हिजाब बंदीही मागे घेतली नाही. तेलंगणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी यांच्यावर हल्लाबोल करताना ते म्हणाले, “तेलंगणा काँग्रेसचे प्रमुख आरएसएस अण्णांना तेलंगणात ‘कर्नाटक मॉडेल’ लागू करायचे आहे. याच कारणामुळे ते शेरवानीला शिव्या देत राहतात आणि मुस्लीम टोपी घातलेले दिसणे टाळतात. त्यांचे जिवलग मित्र मोदी यांनी एकदा सांगितले होते “कपड्यांवरून ओळखा” अशी घणाघाती टीकाही औवेसी यांनी केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube