“पंकजांच्या नाराजीची 2 वर्षांपूर्वीच लागली कुणकुण; ऑफरही दिली होती”: औवेसींच्या गौप्यस्फोटांनी खळबळ
Asaduddin Owaisi About Pankaja Munde : भाजपच्या राष्ट्रीय महासचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde)यांना ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहाद उल मुस्लिमीन अर्थात एमआयएमने (AIMIM) पक्षप्रवेशाची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट एमआयएमचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi)यांनी केला आहे. माध्यमांशी संवाद साधताना एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil)यांनी पंकजा मुडे यांना दोन वर्षांपूर्वीच पक्षप्रेवशाबद्दल विचारले होते, असा दावा असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे. (asaduddin-owaisi-says-pankaja-munde-offer-two-year-ago-join-to-aimim)
पंकजा मुंडे BRS मध्ये जाणार का? ठाकरे गटाच्या नेत्यानं सांगितलं खरं कारण
नुकतीच तेलंगनाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडेंना बीआरएसच्या पक्षप्रेवशाबद्दल विचारणा केली आहे. पक्षप्रवेश केल्यास त्यांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली आहे. पंकजा मुंडे बीआरएसमध्ये आल्यास त्यांना मुख्यमंत्रिपद देऊ, असं चंद्रशेखर राव यांनी म्हटलं आहे.
Russia Wagner Rebel: रशियाला मिळणार नवा राष्ट्राध्यक्ष; शिलेदाराचा पुतिन यांच्याविरोधात शड्डू
पंकजा मुंडेंना मुख्यमंत्रिपदाची ऑफर आल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण आले आहे. आता पंकजा मुंडे ही ऑफर स्वीकारणार का, याबद्दल सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. त्याचबरोबर मुंडे ही ऑफरला काय उत्तर देणार याची उत्सुकता सर्वांना लागलेली आहे.
काही दिवसांपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे या आपल्या पक्षात नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. याबद्दलच्या अनेक बातम्या अधूनमधून येत असतात. काही दिवसांपूर्वीच पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून ऑफर आल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर नुकतीच बीआरएसमधून ऑफर आल्याची चर्चा सुरु आहे. हे सर्व सुरु असतानाच एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी आपल्या पक्षाने दोन वर्षांपूर्वीच पंकजा मुंडेंना ऑफर दिल्याचे सांगितले आहे.